मुंबई - पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी झिम्बाब्वेचा दौरा हा अविश्वसनीय ठरला. पाकिस्तानने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 5-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. फखर झामन आणि इमाम-उल-हक या पाकिस्तानच्या दोन फलंदाजांसाठी ही मालिका ख-या अर्थाने अविस्मरणीय ठरली आहे. झामन आणि इमाम यांनी या मालिकेत विश्वविक्रमांची नोंद केली आहे.
28 वर्षीय झामनने या वन डे मालिकेत एकूण नाबाद 455 धावा केल्या आणि हा एक विश्वविक्रम आहे. त्याने याच मालिकेत 210 धावांची खेळी केली होती आणि पाकिस्तानकडून द्विशतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. मालिकेत नाबाद राहण्याचा विक्रम याआधी पाकिस्तानच्याच मोहम्मद युसूफच्या नावावर होता.
पाकिस्तानच्याच इमाम-उल-हकने पहिल्या नऊ वन डे सामन्यांत चार शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूला पहिल्या दहा वन डेत तीनपेक्षा अधिक शतक करता आलेले नाहीत.
Web Title: Pakistan's batsman's Imam-ul-haq and Fakhar Zaman creat world record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.