Join us  

पाकिस्तानच्या फलंदाजांनी केला कोणालाही न जमलेला विक्रम!

पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी झिम्बाब्वेचा दौरा हा अविश्वसनीय ठरला. पाकिस्तानने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 5-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. फखर झामन आणि इमाम-उल-हक या पाकिस्तानच्या दोन फलंदाजांसाठी ही मालिका ख-या अर्थाने अविस्मरणीय ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 10:47 AM

Open in App

मुंबई - पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी झिम्बाब्वेचा दौरा हा अविश्वसनीय ठरला. पाकिस्तानने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 5-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. फखर झामन आणि इमाम-उल-हक या पाकिस्तानच्या दोन फलंदाजांसाठी ही मालिका ख-या अर्थाने अविस्मरणीय ठरली आहे. झामन आणि इमाम यांनी या मालिकेत  विश्वविक्रमांची नोंद केली आहे. 

28 वर्षीय झामनने या वन डे मालिकेत एकूण नाबाद 455 धावा केल्या आणि हा एक विश्वविक्रम आहे. त्याने याच मालिकेत 210 धावांची खेळी केली होती आणि पाकिस्तानकडून द्विशतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. मालिकेत नाबाद राहण्याचा विक्रम याआधी पाकिस्तानच्याच मोहम्मद युसूफच्या नावावर होता. पाकिस्तानच्याच इमाम-उल-हकने पहिल्या नऊ वन डे सामन्यांत चार शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूला पहिल्या दहा वन डेत तीनपेक्षा अधिक शतक करता आलेले नाहीत. 

टॅग्स :पाकिस्तानक्रिकेटक्रीडा