पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बिलावर भट्टी याला सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. क्वैद ए आझम ट्रॉफीत साऊदर्न पंजाब विरुद्ध बलूचिस्तान यांच्यात कराची येथे सामना खेळवण्यात आला आणि त्यात भट्टीच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला. त्यानंतर भट्टीला एकदम सैरभेर झाला.
२९ वर्षीय फलंदाज सकाळच्या सत्रात फलंदाजीला मैदानावर आला आणि त्यावेळी खुर्रम शेहजाद यानं टाकलेला बाऊन्सर त्याच्या डोक्यावर जोरात आदळला. त्याला लगेच मैदानाबाहेर नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर भट्टी पुन्हा मैदानावर परतला आणि १८ चेंडूंत ३ धावा करून माघारी परतला. त्याला गरगरल्यासारखे वाटू लागल्यानं त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या सुधारत आहे. भट्टीनं सामन्यातून माघार घेतली आहे. साऊदर्न पंजाबनं त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मोहम्मद अब्बास याचा समावेश करण्यात आळा.
पाहा व्हिडीओ...
भट्टीनं
पाकिस्तानकडून २ कसोटी, १० वन डे व ९ ट्वेंटी-20 सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत. २०१५मध्ये त्यानं पाकिस्तानकडून अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता.
Web Title: Pakistan’s Bilawal Bhatti Hospitalised After Scary Hit On The Head During Quaid-e-Azam Trophy Match, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.