ढाका : अटीतटीच्या झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत बांगलादेशविरुद्धची टी-२० मालिकी ३-० ने जिंकली. शेवटच्या षटकात ८ धावांची गरज असताना बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाहने तीन गडी बाद करत पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्याऱ्या बांगलादेशला निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १२४ धावाच करता आल्या. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानने संथ सुरुवात केली. हैदर अली आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वेगाने धावा करता आल्या नाहीत.
संक्षिप्त धावफलक बांगलादेश २० षटकांत ७ बाद १२४ (मोहम्मद नईम ४७, शामीम हुसेन २२, मोहम्मद वसीम २/१५, उस्मान कादिर २/३५) पराभूत वि. पाकिस्तान २० षटकांत ५ बाद १२७ (हैदर अली ४५, मोहम्मद रिझवान ४०, महमुदुल्लाह ३/१०)