'अभिनंदन भावा, मी तुझ्यासाठी...' 'सूर्या'नंतर सर्फराजसाठी पाकिस्तानी खेळाडूची मन जिंकणारी पोस्ट Viral 

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी सर्फराज खानला भारतीय संघात संधी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 04:00 PM2024-01-30T16:00:09+5:302024-01-30T16:03:39+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan's cricketer imam ul haq congratulate indian cricketer sarfaraz khan post has been viral on social media | 'अभिनंदन भावा, मी तुझ्यासाठी...' 'सूर्या'नंतर सर्फराजसाठी पाकिस्तानी खेळाडूची मन जिंकणारी पोस्ट Viral 

'अभिनंदन भावा, मी तुझ्यासाठी...' 'सूर्या'नंतर सर्फराजसाठी पाकिस्तानी खेळाडूची मन जिंकणारी पोस्ट Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 2nd Test : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी सर्फराज खानला भारतीय संघात संधी मिळाली आहे. के एल राहूल तसेच रविंद्र जडेजा या फलंदाजांना दुखापतीमुळे कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे सर्फराज खानला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. 

देशांतर्गत सामन्यांमध्ये आपल्या दमदार खेळीने हा खेळाडू प्रकाशझोतात आला. त्याच्या उत्त्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्फराज खानला संधी मिळाली. के एल राहुलला दुखापत झाल्यानंतर भारतीय संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यातच सर्फराज खानच्या नशीबाचे दार उघडलं आणि या खेळाडूला टीम इंडियात स्थान मिळालं. 

दरम्यान, टीम इंडियात वर्णी लागल्यानंतर सरफराज खानवर क्रिकेट जगतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आजी-माजी क्रिकेटर्सनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय. सर्फराज खानच्या आगमनाने टीम इंडियाची पकड आणखी मजबुत होणार असण्याची शक्यता नोंदवण्यात येतेय. अलिकडेच मुंबईकर सूर्यकुमार यादवने सरफराजच्या निवडीनंतर सोशल मीडियावर मन जिंकणारी एक पोस्ट केली होती. त्या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते. त्यात आता एका पाकिस्तानी खेळाडूने केलेली पोस्ट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

भारतीय संघानेसर्फराज खानच्या फलंदाजीची दखल घेत त्याला संघात स्थान दिले. त्यावर पाकिस्तानी फलंदाज  इमाम उल हकने त्याचे अभिनंदन केले आहे.  'अभिनंदन भावा, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे'. यासोबतच त्याने हार्ट इमोजीही बनवून एक्सवर एक पोस्ट शेअर केला आहे. 

सर्फराज खानची कारकीर्द :

सर्फराज खान गेल्या ९ वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. असे असूनही त्याला अजूनही भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.सर्फराज खानने देशांतर्गत क्रिकेटमधील ४५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३९१२ धावा केल्या आहेत. या काळात त्याने १४ शतके झळकली. त्यामुळे सर्फराज खानला भारतीय संघात समावेश करण्याची मागणी सातत्याने होत होती.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार) , मुकेश कुमार, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर, सौरभ कुमार

Web Title: Pakistan's cricketer imam ul haq congratulate indian cricketer sarfaraz khan post has been viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.