ICC Men's Cricket World Cup - आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी काही खास झालेली नाही आणि सलग चौथ्या पराभवामुळे त्यांचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघामध्ये सारे काही आलबेल नक्कीच नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना ५ महिने पगार दिलेले नाही, त्यात ते करारावरून वाद घालून भारतात वर्ल्ड कप खेळायला आहे आणि पराभवांमागून पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना १ विकेटने हार मानावी लागली. त्यात ICC ने त्यांना धक्का दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना षटकांची गती संथ ठेवल्याप्रकरणी ICC ने त्यांच्या मॅच फीमधील २० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्याचा निकाल दिला. निर्धारित वेळेत पाकिस्तानच्या संघानं ४ षटकं कमी टाकली आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली. दक्षिण आफ्रिकेकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर मैदानावरील पंच अॅलेक्स व्हार्फ आणि पॉल रीफेल, तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि चौथे पंच रिचर्ड केटलबरो यांनी हे आऱोप केले आणि बाबर आजमने ते मान्य केले.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहा सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आहे आणि १९९२ च्या चॅम्पियन्सना उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची उर्वरित तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. पुढील सामन्यात त्यांना बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे.