पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज

लाहोर येथून इस्लामाबाद येथे स्पेशल कारनं पाठवण्यात आलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:29 AM2020-07-21T11:29:03+5:302020-07-21T11:29:20+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan’s fast-bowler Haris Rauf tests positive for fourth time | पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज

पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याचा कोरोना रिपोर्ट चौथ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. हॅरिसची पाचवेळा कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यापैकी चार चाचण्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पहिल्या चाचणीत त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. लाहोर येथे त्याची चाचणी करण्यात आली. (Pakistan’s fast-bowler Haris Rauf tests positive for fourth time)
 

हॅरिसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला लगेचच आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले. हॅरिसला लाहोर येथून इस्लामाबाद येथे स्पेशल कारनं पाठवण्यात आलं. 26 वर्षीय गोलंदाज पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या ( पीसीबी) वैद्यकीय टीमच्या संपर्कात राहणार आहे. 10 दिवसांनंतर त्याची पुन्हा चाचणी करण्यात येईल. सलग तीनवेळा पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात आले नाही. तो बरा न झाल्यास त्याला इंग्लंडमध्ये ट्वेंटी-20 मालिकेला मुकावे लागेल. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. (Pakistan’s fast-bowler Haris Rauf tests positive for fourth time)

दरम्यान, पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर गेले असून तेथे त्यांचा सराव सामनाही सुरू झाला आहे. पण, अजूनही काही खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहेत. जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरनं आता इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) त्याला दुजोराही दिला आहे. त्यात त्यांनी शोएब मलिक याचा इंग्लंड दौरा लांबवणीवर पडल्याचीही माहिती दिली. (Pakistan’s fast-bowler Haris Rauf tests positive for fourth time)

दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी आमीर पत्नीसोबत लाहोर येथेच थांबला होता. मागील आठवड्यात त्याच्या घरी नन्ही परी जन्माला आली आणि आता त्यानं इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी पीसीबीकडे विनंती केली आहे. त्याशिवाय पीसीबीनं संघ व्यवस्थापकाच्या विनंतीमुळे मोहम्मद इम्रान यांनाही पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.
आमीर आणि इम्रान यांची कोरोना आज कोरोना चाचणी होईल आणि इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी त्यांच्या दोन्ही चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघांनाही लाहोर येथील जैव सुरक्षितता वातावरणार रहावे लागेल आणि बुधवारी दुसरा रिपोर्ट काढण्यात येईल. त्यानंतर ते इंग्लंडसाठी रवाना होतील. आमीर इंग्लंडमध्ये दाखल होताच राखीव यष्टिरक्षक-फलंदाज रोहैल नाझीर याची घरवापसी होईल. 

Read in English

Web Title: Pakistan’s fast-bowler Haris Rauf tests positive for fourth time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.