आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या 2019च्या पुरस्कारांत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचेही नाव आहे. विराटला स्पिरीट ऑफ क्रिकेट या पुरस्कार जाहीर झाला. त्यावर खुद्द कॅप्टन कोहलीनंही आश्चर्य व्यक्त केले. आयसीसीनं जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला वन डे तील सर्वोत्तम खेळाडू ठरला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे आयसीसीच्या वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.
आयसीसीने खेळाडूवृत्ती पुरस्कारात कोहलीला चकित करताना कुणाकुणाला डावलले, वाचाल तर...
गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराटने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले होते. या स्पर्धेत गटसाखळीत भारत आणि ऑस्ट्रेलिया लढतीवेळी स्टीव्ह स्मिथ क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी त्याची हुटिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी मैदानावर फलंदाजी करत असलेल्या विराटने प्रेक्षकांना स्मिथची हुटिंग करू नका, असे आवाहन केले होते. या खिलाडूवृत्तीसाठी आयसीसीनं त्याला हा पुरस्कार जाहीर केला.
या पुरस्काराबाबत आश्चर्य व्यक्त करताना कोहली म्हणाला की,''हा पुरस्कार का मिळाला, याचे मलाच आश्चर्य वाटत आहे. इतकी वर्ष सतत मी चुकीच्या कारणामुळेच चर्चेत राहीलो होतो. पण, स्मिथसोबत जे घडत होतं ते चुकीचं होत. आम्ही जरी प्रतिस्पर्धी असलो, तरी खेळाडू म्हणून एकमेकांचा आदर करतो. तुम्ही मैदानावर स्लेजिंग करा. पण, अशा प्रकारे एखाद्या खेळाडूला डिवचणे योग्य नव्हे. त्याचे मी कधीच समर्थन करणार नाही.''
मागील वर्षी प्रेक्षकांना मधलं बोट दाखवलं म्हणून विराटला मॅच फिमधील 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागली होती. तीन वर्षांपूर्वी विराटनं स्मिथवर टीका केली होती. एका सामन्यात DRS घेण्यासाठी स्मिथ ड्रेसिंग रुमच्या दिशेनं पाहून सल्ला घेत होता, त्यावरून विराटनं त्याला खडे बोल सुनावले होते. त्यामुळे खिलाडूवृत्तीसाठी पुरस्कार जाहीर होताच, विराटलाही अजब वाटलं. विराटच्या त्या प्रतिक्रियेवर पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरनं मत नोंदवलं. ''एका महान खेळाडूकडून महान विचार,'' असं तो म्हणाला.
पाहा विराटनं काय प्रतिक्रिया दिली
मोहम्मद आमीरचं ट्विट...