नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाला सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. जवळपास सर्वच संघांनी टी-20 विश्वचषकासाठी आपल्या संघांची घोषणा केली आहे. भारतीय संघ आगामी विश्वचषकात एका नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. भारतासह अन्य काही देशांनी देखील आपली नवीन जर्सी लॉन्च केली आहे. यादरम्यान पाकिस्तानची देखील नवीन जर्सी समोर आली आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इतर काही खेळाडूंचे नवीन जर्सीमधील फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंची चाहतेही चांगलीच खिल्ली उडवत आहेत, मात्र अद्याप पाकिस्तानने अधिकृतपणे कोणतीच नवीन जर्सी लॉन्च केली नाही. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून पाकिस्तानच्या संघाची खिल्ली उडवली जात आहे.
व्हायरल होणाऱ्या या जर्सीवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या जर्सीवर कलिंगडाचे चित्र दाखवण्यात आले आहे, ज्यावरून चाहते पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली की ही तर कलिंगडाची डिझाइन आहे आणि त्यानुसार वर्ल्ड कप जर्सी बनविली आहे. नवीन जर्सी परिधान केल्याचा बाबर आझमचा फोटो खूप व्हायरल होत आहे.
दरम्यान, रविवारी भारतीय संघाची नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह अन्य स्टार खेळाडूंच्या उपस्थितीत नवीन जर्सीचे अनावरण झाले. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी विश्वचषकात 23 ऑक्टोंबर रोजी आमनेसामने असणार आहेत.
टी-20 विश्वचषकासाठी दोन्ही देशांचे संघ
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, फखर झमान, शाहनवाज दहानी.
Web Title: Pakistan's new jersey for the T20 World Cup has been leaked and memes are going viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.