नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या वाद सुरु आहे. वन डे विश्वषचकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठे निर्णय घेत संघरचना बददली. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यांनतर शान मसूदला कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. तर, शाहीन आफ्रिदीच्या खांद्यावर ट्वेंटी-20 संघाची धुरा आहे. अशातच पाकिस्तानाच्या कर्णधारपदाचे स्वप्न पाहणाऱ्या इमाद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
पाकिस्तानची ऑस्ट्रेलियात 'कसोटी', नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ जाहीर; रौफचा पत्ता कट
खरं तर इमाद वसिम आगामी काळात पाकिस्तानचा कर्णधार होईल अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. एवढेच काय तर खुद्द वसीमने देखील याबद्दल इच्छा व्यक्त केली होती. मात्र, वारंवार संघातून वगळल्याने त्याने धाडसी निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली.
पाकिस्तानी संघ आगामी काळात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी संघ जाहीर झाला असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र इमाद वसीमला संघात स्थान मिळाले नाही.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
- दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)