कराची : विश्वचषकातील पराभव पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे. कारण आता पाकिस्तानच्या संघाच्या फिटनेसवर जोर देण्यात येणार आहे. पण त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला यापुढे बिर्याणी खाता येणार नाही, असे म्हटले जात आहे.
पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान यांनी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट जे सांगेल, तोच आहार खेळाडूंना घ्यावा लागणार आहे.
पाकिस्तानी मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता खेळाडूंना बिर्याणी खायला मिळणार नाही. कारण आता स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टनुसारच त्यांना आहार करावा लागेल. त्यामुळे आता त्यांना डाळ-भात आणि भाज्यांवर जास्त भर द्यावा लागणार आहे.
Web Title: Pakistan's players will not eat biryani
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.