Asia Cup 2022:आशिया कपसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा; २८ ऑगस्टला भारताविरूद्ध 'रणसंग्राम' 

पाकिस्तानच्या संघाने आगामी नेदरलँड आणि यूएईत होणाऱ्या टी-२० आशिया कपसाठी संघाची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 01:39 PM2022-08-03T13:39:25+5:302022-08-03T13:40:03+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan's squad for Asia Cup 2022 has been announced | Asia Cup 2022:आशिया कपसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा; २८ ऑगस्टला भारताविरूद्ध 'रणसंग्राम' 

Asia Cup 2022:आशिया कपसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा; २८ ऑगस्टला भारताविरूद्ध 'रणसंग्राम' 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघाने आगामी नेदरलँड आणि यूएईत होणाऱ्या टी-२० आशिया कपसाठी (Asia Cup 2022) आपल्या संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तान आपला आशिया कपमधील पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरूद्ध खेळेल. मागील काही मालिकांपासून संघाबाहेर असलेल्या शाहिन आफ्रिदीचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे. अलीकडेच पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिका खेळली होती. आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. 

नेदरलॅंडविरूद्धच्या आणि आशिया कप या दोन्ही संघामध्ये पाकिस्तानच्या संघाची धुरा बाबर आझमकडे असणार आहे. नेदरलॅंडविरूद्ध मालिका खेळणाऱ्या पाच खेळाडूंना आशिया कपच्या संघातून वगळण्यात आले आहे. अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद हरिस, सलमान अली आगा आणि झाहिद महमूद यांच्या जागी आसिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अहमद आणि उस्मान कादिर यांचा समावेश केला जाईल. पाकिस्तानचा संघ नेदरलॅंडविरूद्ध १६, १८ आणि २१ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामने खेळेल. 

आशिया कपमध्ये ३ वेळा भारत विरूद्ध पाकिस्तान?
भारत, पाकिस्तान आणि एका क्वालिफायर संघाला ग्रुप-ए मध्ये ठेवण्यात आले आहे, तर ग्रुप बी मध्ये यजमान श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आहे. सर्व सामने स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता सुरू होतील. या टूर्नामेंटमधील १० सामने दुबईत तर ३ सामने शारजाह येथे खेळवले जातील. सर्वच संघ राउंड-रॉबिन पद्धतीने एकमेकांसमोर एका सामन्यात भिडतील. प्रत्येक ग्रुपमधील पहिले दोन संघ उपांत्यफेरीत नाही तर सुपर-४ राउंडसाठी क्वालिफाय करतील. नंतर पुन्हा एकदा सर्व संघ एकमेकांसमोर आपली प्रतिभा दाखवतील आणि सुपर ४ मधील पहिले दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. आशिया कपचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे. या स्पर्धेची रूपरेषा पाहता भारत-पाकिस्तानचे संघ तीनवेळा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

नेदरलॅंडविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, अब्दुल्ला शफीक, फखर रिझवान, हारिस रौफ, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सलमान अली आगा, शाहिन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी, जाहिद महमूद.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब कान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिरी. 

 

Web Title: Pakistan's squad for Asia Cup 2022 has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.