दुबई - क्रिकेट सामन्यांदरम्यान क्रीडा वाहिन्यांवर चालणाऱ्या कार्यंक्रमांचे संचालन करणाऱ्या महिला अँकर त्यांचे सफाईदार वक्तृत्व आणि सौंदर्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. पण नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानच्या युवा क्रिकेटपटूने चक्क एका महिला अँकरचा उल्लेख आंटी असा केला. श्रीलंकेविरुद्ध खेळताना पदार्पणातच शतक फटकावणाऱ्या इमाद उल हक याने एका महिला अँकरने केलेल्या कौतुकारवर हा तिरकस ड्राइव्ह मारला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकचा नातेवाईक असलेल्या इमाम उल हकने पदार्पणातच शतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पदार्पणातच शतक ठोकल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. या २१ वर्षीय फलंदाजाचे कौतुक करणाऱ्यांमध्ये अर्थातच महिला चाहत्यांचे प्रमाण लक्षणीय होते. पीटीव्हीची आघाडीची महिला अँकर फझीला साबा इमाम हिचाही इमाम उल हकचे कौतुक करणाऱ्यांमध्ये समावेश होता. फझिलाने इमामचे कौतुक केल्यावर इमामनेही तिला प्रतिसाद देत धन्यवाद फझिला आंटी म्हणत तिचे आभार मानले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला.खुद्द फझिला हीसुद्धा इमामच्या या कृतीने अवाक् झाली. तिने हा प्रकार खेळीमोळीने घेत दोघांचाही फोटो अपलोड केला आणि आंटीकडून अभिनंदन असे ट्विट करत वेळ निभाऊन नेली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पाकिस्तानच्या युवा क्रिकेटपटूने स्पोर्ट्स अँकरला म्हटले आंटी
पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पाकिस्तानच्या युवा क्रिकेटपटूने स्पोर्ट्स अँकरला म्हटले आंटी
क्रिकेट सामन्यांदरम्यान क्रीडा वाहिन्यांवर चालणाऱ्या कार्यंक्रमांचे संचालन करणाऱ्या महिला अँकर त्यांचे सफाईदार वक्तृत्व आणि सौंदर्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. पण नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानच्या युवा क्रिकेटपटूने चक्क एका महिला अँकरचा उल्लेख आंटी असा केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 6:34 PM