लाहोर : पाकिस्तानच्या युवा क्रिकेटरने निवड प्रक्रियेत सातत्याने होणाºया अन्यायाला कंटाळून येथे स्टेडियममध्ये प्रथमश्रेणी लढतीदरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या क्रिकेटपटूने निवड समिती सदस्यांवर लाच घेत असल्याचा आरोप लावला. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शनिवारी लाहोर सिटी क्रिकेट संघाच्या (एलसीसीए) सामन्यादरम्यान उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गुलाम हैदर अब्बासने स्टेडियममध्ये जात स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कायद ए आजम करंडकाचा हा सामना पाहणाºया प्रेक्षकांनी या क्रिकेटपटूला आत्महत्या करण्यापासून रोखले. त्यानंतर एलसीएच्या पदाधिकाºयांनी त्याला शांत केले. अब्बास हा पूर्व विभागातील आहे. प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यात लाहोर संघाकडून खेळण्याची संधी मिळेल अशी पदाधिकाºयांनी खोटी आश्वासने दिल्याने आपण त्रस्त झाल्याचे अब्बासने सांगितले.हा गोलंदाज म्हणाला, ‘मी क्लब आणि विभागीय पातळीवर चांगली कामगिरी करीत आहे; परंतु मी गरीब कुटुंबातील असल्यामुळे माझ्याकडे निवड समिती सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. अखेर त्यांनी लाहोर संघाकडून खेळायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे मला सांगितले. त्यामुळे मी या जाचाला कंटाळून येथे आलो आणि जीवनाचा अखेर करू इच्छितो.’पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आपले म्हणणे ऐकले नाही तर गद्दाफी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वत:ला जाळून घेऊ, अशी धमकीही अब्बासने दिली आहे. जर मी गतप्राण झालो तर त्यासाठी एलसीसीए प्रमुख आणि पूर्व विभागाचे पदाधिकारी त्यास जबाबदार असतील. कारण ते पात्रतेच्या आधारावर खेळाडूंची निवड करीत नाहीत, असेही अब्बासने सांगितले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पाकिस्तानी युवा वेगवान गोलंदाजाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:च्या अंगावर टाकले पेट्रोल
पाकिस्तानी युवा वेगवान गोलंदाजाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:च्या अंगावर टाकले पेट्रोल
पाकिस्तानच्या युवा क्रिकेटरने निवड प्रक्रियेत सातत्याने होणाºया अन्यायाला कंटाळून येथे स्टेडियममध्ये प्रथमश्रेणी लढतीदरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:43 AM