Hardik Pandya Six, IPL 2022 GT vs SRH Live: सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) च्या पहिल्या दोन विकेट्स झटपट गेल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या लवकर मैदानात आला. हार्दिकने आधी उमरान अकमलच्या गोलंदाजीवर दोन दमदार चौकार लगावले. त्यानंतर पुढच्या षटकात एडन मार्करम स्पिन गोलंदाजी टाकायला आला. हार्दिकने फार वेळ न घेता त्याला उत्तुंग असा षटकार खेचला. हार्दिकचा षटकार केवळ उंचच नव्हे तर तब्बल १०० मीटर लांब जाऊन पडला. पाहा हार्दिकचा षटकार-
त्याआधी गुजरातकडून प्रथम फलंदाजीला आलेल्या शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी मोठी खेळी करता आली नाही. गिल ७ धावांवर आणि वेड १७ धावांवर बाद झाला. सलामीवीर बाद झाल्यानंतर नवखा साई सुदर्शनदेखील ११ धावांवर माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलरच्या साथीने डाव पुढे नेला. मिलर १२ धावा काढून बाद झाला. पण हार्दिकने एक बाजू लावून धरत कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.
गुजरात टायटन्स संघ: मॅथ्यू वेड (किपर), शुभमन गिल, साई एस, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे
सनरायझर्स हैदराबाद संघ: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (डब्ल्यू), एडन मार्कराम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन