लखनऊ : यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने संघात कायम राहण्यासाठी देशातंर्गत क्रिकेटमध्ये खेळून स्वत:ला सिद्ध करावे, असे मत भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले.
लखनऊच्या शिया कॉलेजच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी किरमाणी बोलत होते. ते म्हणाले, ‘पंत नक्कीच प्रतिभाशाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार खेळ करण्यासाठी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळ करून पुढे जायला हवे.’
किरमाणी यांनी लोकेश राहुल याचे उदाहरण दिले. जेव्हा त्याचा खेळ खराब झाला तेव्हा त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे पसंत केले. रणजी ट्रॉफी आणि अन्य स्पर्धांमध्ये खेळून धावा केल्या आणि नंतर टीम इंडियात पुनरागमन केले. पंतलादेखील असेच काहीसे करावे लागेल.’
१९ वर्षांच्यातील संघाच्या खेळाडूला अचानक टीम इंडियामध्ये स्थान देणे हे समस्यांना निमंत्रण देते. प्रत्येक खेळाडू सचिन तेंडुलकर
नसतो. दिनेश कार्तिक, रिद्धीमान साहा, संजू सॅमसन यांच्या रूपात भारताकडे यष्टिरक्षकांचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. माझ्या
मते कामगिरीच्या आधारावर त्यांची निवड व्हावी, असेही किरमानी यांनी नमूद केले.
Web Title: Pant should play in domestic cricket - Kirmani
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.