Join us

पंत-विराटची शॉर्ट लेंथ चेंडूवर 'कसरत'; KL राहुलला दुखापतीमुळं सोडावं लागलं मैदान

पर्थ टेस्ट आधी टीम इंडियातील खेळाडूंनी इंट्रा स्क्वॉड मॅचच्या माध्यमातून सराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:09 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघ २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानातून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मोहिमेला सुरुवात करणार आहे. या कसोटी सामन्याआधी सराव सत्रानंतर भारतीय संघातील खेळाडू प्रॅक्टिस मॅचसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. १५ नोव्हेंबरपासून  पर्थच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन (WACA) स्टेडियमवर भारतीय संघातील खेळाडू इंट्रा स्क्वॉड मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरले. भारत विरुद्ध भारत 'अ' असा सामना सुरु आहे.

KL राहुलला दुखापत या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलच्या कोपराला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याच्यावर  मैदान सोडण्याची वेळ आली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पर्थच्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलकडे सलामीवीराच्या रुपात पाहिले जात आहे. पण दुखापतीमुळे टीम इंडियाल मोठा फटका बसला आहे.

विराटसह पंतनं शॉर्ट लेंथ चेंडूवर फेकली विकेट 

भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ज्या शॉर्ट लेंथ चेंडूवर सहज खेळताना दिसला. त्या चेंडूवर विराट कोहली आणि रिषभ पंतन विकेट फेकली.  पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय संघातील खेळाडूंनी दोन डावात बॅटिंग केली. यात पहिल्या डावात १५ धावांवर बाद झालेला विराट कोहलीनं दुसऱ्या डावात ३० धावा केल्या. रिषभ पंत पहिल्या धावात २० धावसंख्येच्या आत तंबूत परतला. दुसऱ्या डावात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर तो फसला. प्रसिद्ध कृष्णासह नीतीश रेड्डीनं विराट कोहलीला दमवल्याचे पाहायला मिळाले. 

दुखापतीचं ग्रहण अन् त्यामागची गोष्ट

लोकेश राहुल, सर्फराज खान यांच्यासह विराट कोहलीच्याही दुखापतीचे वृत्त चर्चेचा विषय ठरत आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तामध्ये यासंदर्भातील बातम्या दिल्या असल्या तरी भारतीय ताफ्यातून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी पर्थ कसोटी सामना आणि ही मालिका जिंकणं खूप महत्त्वाचे झाले आहे. याआधी टीम इंडियाला दुखापती ग्रहण लागलं असलं तरी टेन्शनची कोणतीही गोष्ट नाही, असे बोलले जात आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीलोकेश राहुल