बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने घरच्या मैदानावर खेळताना बलाढ्य मुंबई इंडियन्सचा ८ विकेट्स राखत पराभव करत यंदाच्या आयपीएलमध्ये दणदणीत विजयी सलामी दिली. जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आरसीबीने कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहलीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बाजी मारली. यासह मुंबईची आयपीएलमध्ये सलग अकराव्यांदा पराभवाने सुरुवात झाली.
आरसीबी आणि मुंबई इंडियन्सच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या २० वर्षीय खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधलं. बंगळुरु विरोधात मुंबईच्या तिलक वर्माने ८४ धावांची झंझावाती खेळी केली. तिलक वर्माने नाबाद ८४ धावा केल्या. मात्र, त्याची ही कामगिरी वाया गेली कारण, मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतरही मुंबईने तिलक वर्माच्या या खेळीमुळे आव्हानात्मक मजल मारली. या सामन्यात तिलक वर्माच्या कुटुंबियांनी देखील मैदानात हजेरी लावली होती. तिलक वर्माच्या आक्रमक खेळीने त्याचे कुटुंबिय देखील खूप आनंदी होते. त्यांनी देखील तिलक वर्माने अर्धशतक झळकवल्यानंतर उभे राहून टाळ्या वाजवल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केलेल्या आरसीबीने मुंबईला २० घटकांत ७ बाद १७१ धावांवर रोखले. हे आव्हान आरसीबीने १६.२ षटकांतच पार करताना २ बाद १७२ धावा केल्या. डुप्लेसिसने ४३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ७३ धावा केल्या. कोहलीने ४९ चेंडूंत नाबाद ८२ धावा फटकावताना ६ चौकार व ४ षटकार मारले. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात पहिल्याच चेंडूवर कोहलीचा झेल सोडला. डुप्लेसिस- कोहली यांनी ८९ चेंडूत १४३ धावांची जबरदस्त सलामी देत निकाल स्पष्ट केला. या सामन्याचा डुप्लेसिस सामनावीर ठरला.
Web Title: Parents emotional after seeing Tilak Verma's aggressive batting; Standing applause, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.