कानपूर : पुण्यातील पिच प्रकरणापासून धडा घेणा-या बीसीसीआयने उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला(यूपीसीए)रविवारी ग्रीन पार्कवर होणा-या भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिस-या वन डेपूर्वी खेळपट्टीची कडेकोट सुरक्षा करण्याचे निर्देश दिले.यूपीसीएचे कार्यकारी सचिव युद्धवीरसिंग म्हणाले,‘वैध पास असलेल्यांश्विाय कुणालाही पिचजवळ जाण्याची परवानगी नसल्याचे सुरक्षा अधिकाºयांना कळविण्यात आले आहे. पिचच्या स्वरूपाबद्दल कुणाशीही चर्चा करू नका, असे मैदान कर्मचाºयांना बजावण्यात आले आहे. बीसीसीआय क्यूरेटर तापोश चॅटर्जी हे या पिचची देखरेख करीत आहेत.तिसºया आणि निर्णायक वन डे पूर्वी बोलताना सिंग पुढे म्हणाले,‘पुण्यात झालेल्या घटनेवरून आम्ही आणखी सावध झालो. ज्यांच्याकडे वैध पास आहे अशांनाच स्टेडियमच्या आत प्रवेश द्या, असे सुरक्षा रक्षकांना सांगितले आहे.’ ग्रीन पार्कची खेळपट्टी तयार करण्यास ट्यूबवेल आॅपरेटर शिवकुमार याला क्यूरेटर बनविण्यात आले होते, अशी माहिती आहे. सध्या तो स्टेडियमकडे फिरकलेला नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी यंदा आयपीएल सामन्याआधी खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करणाºया तीन सट्टेबाजांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासूनच शिवकुमार हा गाझियाबाद येथे राहण्यासाठी गेला आहे. ग्रीन पार्कवर पहिल्यांदा दिवस- रात्रीचा सामना होणार आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ग्रीन पार्कच्या खेळपट्टीला ‘फूलप्रूफ’ सुरक्षा, पुणे ‘पिच’ प्रकरणापासून बीसीसीआयने घेतला धडा
ग्रीन पार्कच्या खेळपट्टीला ‘फूलप्रूफ’ सुरक्षा, पुणे ‘पिच’ प्रकरणापासून बीसीसीआयने घेतला धडा
कानपूर : पुण्यातील पिच प्रकरणापासून धडा घेणा-या बीसीसीआयने उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला(यूपीसीए)रविवारी ग्रीन पार्कवर होणा-या भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिस-या वन डेपूर्वी खेळपट्टीची कडेकोट सुरक्षा करण्याचे निर्देश दिले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 4:15 AM