Join us  

India Tour to England : २८ वर्षानंतर टीम इंडियात पारशी खेळाडू; जाणून घ्या कोण आहे अर्जान नगवस्वाला!

बीसीसीआयनं शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय जम्बो संघ जाहीर केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ लंडनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल अन् इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 1:30 PM

Open in App

बीसीसीआयनं शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय जम्बो संघ जाहीर केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ लंडनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल अन् इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघात कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्विन, मोहम्मद शमी या नियमित खेळाडूंचा समावेश आहेच. शिवाय शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल व मोहम्मद सिराज यांनी आपले स्थान कायम राखले आहे. आर अश्विन व हनुमा विहारी यांचे पुनरागमन ही संघासाठी मोठी गोष्ट आहे. Team India WTC Plan : दोन टप्प्यांत १८ दिवसांचे क्वारंटाईन, खेळाडूंसह कुटुंबीयांनाही प्रवासाला परवानगी

राखीव खेळाडूंमध्ये अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नगवस्वाला यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या तीन खेळाडूंबाबत चाहत्यांना थोडीबहुत माहिती आहे, पण अर्जान हे नाव अनेकांसाठी नवं आहे.  

कोण आहे गुजरातचा अर्जान नगवस्वाला? ( Who is Gujarat pacer Arzan Nagwaswalla?) 

१७ ऑक्टोबर १९९७मध्ये अर्जानचा गुजरात येथे जन्म झाला. २३ वर्षीय डावखुरा जलदगती गोलंदाजाच्या कामगिरीनं निवड समिती सदस्यांना प्रभावित केले आहे. २०१७-१८च्या सत्रात त्यानं बडोदा संघाविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्यानं हळुहळू सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं तिसऱ्याच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यात सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, सिद्धेश लाड आणि आदित्य तरे यांचा समावेश होता. तो सामना गुजरातनं ९ विकेट्स राखून जिंकला होता. त्यानं ८ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्यो होत्या आणि ९० धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेनं पत्नीसह घेतला कोरोना लसीचा पहिला डोस; इतरांनाही केलं आवाहन! 

रणजी करंडक स्पर्धेच्या त्याच्या दुसऱ्या पर्वात त्यानं ८ सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या. जानेवारी २०२०मध्ये त्यानं पंजाबविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. गुजरातनं तो सामना ११० विकेट्सनं जिंकला होता. विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं ७ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या आणि ५४ धावांत ६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. दुसरीकडे त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ५ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या.  

भारतीय संघातील पारसी खेळाडू ( PARSI CRICKETERS TO HAVE PLAYED FOR INDIA) - फिरोज एडल्जी पालीया, सोराबजी होर्मसजी मुंचेर्षा कोलाह, रुस्तोमजी जमशेदजी, खेर्शेद रुस्तोमजी मेहेरहोमजी, रुसितोमजी शेरीयार मोदी, जमशेद खुदादाद इरानी, केकी खुर्शेदजी तारापोर, पहलान रतनजी उम्पीगर, नरी काँट्रॅक्टर, रुसी फ्रामरोझ सुर्ती, फारुख इंजिनियर, डायना एडल्जी, बेहरोज एडल्जी, रुसी जीजीभोय ( राखीव यष्टिरक्षक - १९७१चा वेस्ट इंडिज दौरा)  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध न्यूझीलंड