Virat Kohli on Jasprit Bumrah, IPL 2022: भारतीय क्रिकेट संघात सध्याच्या घडीला तीन महत्त्वाची नावं म्हणजे कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. BCCI ने देखील वार्षिक करारात या तिघांनाच सर्वोच्च गटात करारबद्ध केलं आहे. रोहित असो किंवा विराट, दोघांच्याही संघात जसप्रीत बुमराहला नक्कीच स्थान मिळतं. बुमराहने वेळोवेळी त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. पण बुमराहच्या करियरची जेव्हा Mumbai Indians मधून सुरूवात झाली होती, त्यावेळी मात्र विराट कोहलीच्या तोंडून असे काही शब्द निघाले होते, की ते शब्द आता बोलण्यात आले असते तर बुमराहच्या चाहत्यांनाच नव्हे तर भारतीय क्रिकेटरसिकांनाही विराट कोहली नक्की राग आला असता. पार्थिव पटेल (Parthiv Patel) विराटबद्दलचा हा किस्सा सांगितला.
पार्थिव पटेल म्हणाला, "मी २०१४ साली RCB कडून खेळत होतो. त्यावेळी मी विराट कोहलीला म्हटलं होतं की हा बुमराहचा नावाचा गोलंदाज भारी आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यावर विराट म्हणाला होता की 'छोड ना यार... ये बुमराह वुमराह क्या करेंगे?" पार्थिव पटेल मुंबई इंडियन्सकडून खेळला होता आणि त्यामुळेच त्याने हा अंदाज विराटशी बोलताना वर्तवला होता.
पार्थिवने या पुढचीही आठवण सांगितली. "जसप्रीत बुमराहला जेव्हा पहिल्यांदा IPL मध्ये खरेदी करण्यात आलं तेव्हा त्याने २-३ वर्ष रणजी ट्रॉफी खेळली होती. २०१३ हे त्याचं पहिलं वर्ष होतं. २०१४ चा हंगाम त्याच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. २०१५ मध्ये तर जसप्रीत बुमराहची कामगिरी इतकी खराब होत होती, त्याला हंगामाच्या मध्यातच घरी पाठवलं जाईल असं म्हटलं जात होतं. मुंबई इंडियन्सने मात्र त्यावेळी त्याला पाठिंबा दिला आणि त्याची कामगिरी हळूहळू सुधारत गेली. बुमराहने केलेली कठोर मेहनत आणि त्याला मिळालेला ठोस पाठिंबा यामुळेच आज तो आघाडीचा गोलंदाज बनू शकला", असं पार्थिव पटेलने सांगितलं.
Web Title: Parthiv Patel recalls Virat Kohli words about Jasprit Bumrah in IPL 2014 Ye Bumrah Vumrah kya karenge Mumbai Indians Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.