Parthiv Patel Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने काही महिन्यांपूर्वीच सर्व प्रकारची कर्णधारपदं सोडली. IPLमध्येही सध्या तो RCBचा फलंदाज म्हणून खेळतोय. यादरम्यान पार्थिव पटेलने विराटबद्दलचा एक किस्सा काही दिवसांपूर्वी सांगितला होता. Jasprit Bumrah च्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये विराटने 'ये बुमरा वुमरा क्या करेंगे', असं विधान पार्थिव पटेलकडे केलं होतं. पार्थिवच्या या खुलाशानंतर विराटचे चाहते त्याच्यावर चिडले. पण अशा टीकाकारांना पार्थिवने सणसणीत उत्तर दिलं.
पार्थिव पटेलने जेव्हा विराट कोहलीबाबतचा किस्सा सांगितला त्यानंतर त्याच्यावर खूप टीका करण्यात आली. विराटने तुला संघात त्याच्या जोडीने खेळवलं पण तू मात्र त्याच्याबद्दल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतोयस अशा प्रकारची टीका पार्थिववर करण्यात आली. अशा टीकाकारांना पार्थिवने शांतपणे पण सणसणीत उत्तर दिलं. कोणाचंही नाव न घेता त्याने ट्वीट करत साऱ्यांचा समाचार घेतला. 'नीम का पत्ता और सच.. दोनो कडवा होता है', असं ट्वीट करत त्यांना साऱ्यांना गप्प केलं.
काय म्हणाला होता पार्थिव?
पार्थिव पटेल म्हणाला, "मी २०१४ साली RCB कडून खेळत होतो. त्यावेळी मी विराट कोहलीला म्हटलं होतं की हा बुमराहचा नावाचा गोलंदाज भारी आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यावर विराट म्हणाला होता की 'छोड ना यार... ये बुमराह वुमराह क्या करेंगे?" पार्थिव पटेल मुंबई इंडियन्सकडून खेळला होता आणि त्यामुळेच त्याने हा अंदाज विराटशी बोलताना त्याने वर्तवला होता. "जसप्रीत बुमराहला जेव्हा पहिल्यांदा IPL मध्ये खरेदी करण्यात आलं तेव्हा त्याने २-३ वर्ष रणजी ट्रॉफी खेळली होती. २०१३ हे त्याचं पहिलं वर्ष होतं. २०१४ चा हंगाम त्याच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. २०१५ मध्ये तर जसप्रीत बुमराहची कामगिरी इतकी खराब होत होती, त्याला हंगामाच्या मध्यातच घरी पाठवलं जाईल असं म्हटलं जात होतं. मुंबई इंडियन्सने मात्र त्यावेळी त्याला पाठिंबा दिला आणि त्याची कामगिरी हळूहळू सुधारत गेली. बुमराहने केलेली कठोर मेहनत आणि त्याला मिळालेला ठोस पाठिंबा यामुळेच आज तो आघाडीचा गोलंदाज बनू शकला", असं पार्थिव पटेलने सांगितलं.
Web Title: Parthiv Patel unusual tweet after his comment on Virat Kohli Jasprit Bumrah grabbed headlines classic reply to trolls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.