IPL 2022, Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पहिला सामना खेळण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सना ( KKR) मोठा धक्का बसला आहे. मागील पर्वातील उप विजेत्या KKR ने यंदा नव्या खेळाडूंची मोठ बांधून आयपीएल जेतेपद पटकावण्याचे स्वप्न रंगवले आहे. त्यांनी श्रेयस अय्यरला १२.२५ कोटी रुपये खर्चून आपल्या ताफ्यात घेतले आणि कर्णधार बनवले. आता २०१२ व २०१४ नंतर प्रथमच जेतेपद पटकावण्यासाठी हा संघ सज्ज होत आहे. पण, त्यांच्यासमोरील संकट काही सरता सरत नाही.
कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार पॅट कमिन्स व आरोन फिंच ( Pat Cummins and Aaron Finch ) हे दोन प्रमुख खेळाडू आयपीएल २०२२च्या सुरुवातीच्या पाच सामन्यांना मुकणार आहेत. कमिन्स व फिंच हे दोघंही ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यातील संघाचे सदस्य आहेत. KKR २६ मार्चला सलामीचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. पण, या सामन्यात KKRला संपूर्ण ताकदिने मैदानावर उतरता येणार नाही. संघाचे मेंटॉर डेव्हिड हस्सी यांनी कमिन्स व फिंच हे पाच सामन्यांना मुकणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातली मालिका ५ एप्रिलला संपणार आहे आणि KKR त्यांचा पाचवा सामना १० एप्रिलला खेळणार आहे. ५ एप्रिलनंतर ऑसी खेळाडू आयपीएलच्या बायो बबलमध्ये दाखल होतील, परंतु तत्पूर्वी त्यांना क्वांराटाईन व्हावे लागेल. फिंच व कमिन्स यांच्या अनुपस्थितीत सॅम बिलिंग्स व मोहम्मद नबी प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतील. आंद्रे रसेल व सुनील नरीन हे प्लेइंग इलेव्हनमध्ये आधीपासून आहेतच.
कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी), नितीश राणा ( ८ कोटी), पॅट कमिन्स ( ७.२५ कोटी), मोहम्मद नबी ( १ कोटी), सॅम बिलिंग ( २ कोटी), उमेश यादव ( २ कोटी), शिवम मावी ( ७.२५ कोटी), शेल्डन जॅक्सन ( ६० लाख), अजिंक्य रहाणे ( १ कोटी), रिंकू सिंग ( ५५ लाख), अनुकूल रॉय ( २० लाख), अॅलेक्स हेल्स ( १.५० कोटी), रसिख दार ( २० लाख), टीम साऊदी ( १.५० कोटी), बाबा इंद्रजित ( २० लाख), चमिका करुणारत्ने ( ५० लाख), अभिजित तोमर ( ४० लाख), प्रथम सिंग ( २० लाख), अशोक शर्मा ( ५५ लाख), अमन खान ( २० लाख), रमेश कुमार ( २० लाख).
KKR Full Time Table
- २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ३० मार्च- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ६ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १० एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- १५ एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १८ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २३ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- २८ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २ मे - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ७ मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासूनृ
- ९ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १४ मे - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३वाजल्यापासून
- १८ मे - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून