नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स अखेरच्या सामन्यात देखील खेळणार नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यात देखील कांगारूच्या संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे असणार आहे. ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या इंदूर कसोटीत देखील पॅट कमिन्स संघाचा भाग नव्हता.
दरम्यान, कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या आईची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे तो भारत दौरा मध्येच सोडून आपल्या घरी परतला आहे. अहमदाबाद कसोटीपूर्वी पॅट कमिन्सचे पुनरागमन होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तो आता चौथ्या सामन्याला देखील मुकणार आहे. पॅट कमिन्स कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या वन डे मालिकेचा हिस्सा असणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खरं तर आरोन फिंचच्या निवृत्तीनंतर पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाचा आणखी एक खेळाडू जाइल रिचर्डसन हाताच्या दुखापतीमुळे वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी नाथन ॲलिसला संघात स्थान मिळाले आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका
- 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई
- 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
- 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई