Join us  

फूड डिलिव्हरी बॉयने नेदरलँड्सला जिंकून दिला सामना; आफ्रिकेविरुद्धच्या विजयाच्या 'नायका'ची संघर्षपूर्ण कहाणी 

ICC ODI World Cup NED vs SA : एकेकाळी घरोघरी अन्न पोहोचवणारा पॉल व्हॅन मीकरेन ( Paul van Meekeren ) आता जगभरात फेमस झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:46 PM

Open in App

ICC ODI World Cup NED vs SA : एकेकाळी घरोघरी अन्न पोहोचवणारा पॉल व्हॅन मीकरेन ( Paul van Meekeren ) आता जगभरात फेमस झाला आहे. नेदरलँड्ससाठी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने जे काही केले, त्याने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नेदरलँड्सने रोमहर्षक विजयाची नोंद केली. सामन्याच्या पहिल्या टप्प्यात आफ्रिकेचा वरचष्मा होता, परंतु नेदरलँड्सने मोठा अपसेट नोंदवला आणि ३८ धावांनी विजय मिळवला. मीकरेनने एडन मार्कराम आणि मार्को जॅनसेनचे महत्त्वाचे बळी घेतले. 

मीकरेन त्याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे स्टार झाला. एक वेळ अशी होती की वेगवान गोलंदाज मीकरेनला नेदरलँड्सच्या हिवाळ्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२० स्पर्धेपासून त्याला खूप आशा होत्या, परंतु कोविडमुळे तो वर्ल्ड कप २ वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला, त्यानंतर मीकरेनला फूड डिलिव्हरी मॅन म्हणून काम करावे लागले.  

२०२० मध्ये एका ट्विटला उत्तर देताना मीकरेन म्हणाला होता की,''मी आज क्रिकेट खेळायला हवे होते, आता मी जेवण घरोघरी पोहोचवतोय. गोष्टी कशा बदलतात.'' मीकरेनने जगभरात ट्वेंटी-२० आणि टी१० लीग खेळल्या, परंतु तो क्रिकेटच्या जगात स्वत:चे नाव कमावू शकला नाही. १७ ऑक्टोबर रोजी जेव्हा तो नेदरलँड्सच्या ऐतिहासिक विजयाचा एक भाग बनला तेव्हा परिस्थिती बदलली. आता जग त्याला ओळखू लागले. तो स्टार झाला.  

पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांत ८ बाद २४५ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४२.५ षटकांत सर्वबाद २०७ धावांवर आटोपला. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स सामनावीर ठरला, त्याने नाबाद ७८ धावा केल्या आणि ३ झेलही घेतले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपद. आफ्रिका