Join us  

"खेळाडूंना कामगिरीनुसार वेतन द्या, केंद्रीय करार पद्धत बंद करा"

गावसकरांची खळबळजनक मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 5:57 AM

Open in App

नवी दिल्ली : खेळाडूंचा पगार हा त्यांच्या कामगिरीवर ठरला पाहिजे. त्यांना देण्यात येणारा केंद्रीय करार रद्द करण्यात यावा, असा  सल्ला दिग्गज सुनील गावसकर यांनी दिल्यामुळे क्रिकेट विश्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले, ‘माझा सल्ला आहे की, कसोटी सामन्याची मॅच फी वाढविण्यास हरकत नाही. मात्र खेळाडूंना  केंद्रीय कराराद्वारे आधीच पैसे देऊ नका. खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार  पैसे मिळाले तर कदाचित खेळाडू वेगळ्या मानसिकतेने खेळतील.’भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने यजमान  विंडीजचा तीन दिवसांत खुर्दा उडविला. विंडीजसाठी या महिन्यात दोन मोठे धक्के बसले आहेत. आधी हा संघ भारतात होणाऱ्या वन-डे विश्वचषकासाठी पात्र होऊ शकला नाही. त्यानंतर भारतीय संघाने त्यांना अवघ्या तीन दिवसांत अस्मान दाखविले. जेव्हापासून फ्रेंचायजी क्रिकेट सुरू झाले तेव्हापासून वेस्ट इंडीज क्रिकेट रसातळाला जात आहे. वेस्ट इंडीजचे दर्जेदार क्रिकेटपटू हे फ्रेंचायजी क्रिकेटलाच अधिक प्राधान्य देत आहेत. यावर  गावसकर यांनी  जुन्या स्मृतींना उजाळा देत ढासळलेल्या विंडीज क्रिकेटला सुधारण्यासाठी काही सल्लेदेखील दिले.  

ते म्हणाले, ‘मी माझा पहिला दौरा वेस्ट इंडीजचा केला होता. मला माहिती आहे की, तिथे काही जबरदस्त क्रिकेटपटूंनी एक समृद्ध वारसा मागे ठेवला आहे. विंडीजमधील मानसिकता ही कशाचीच काळजी नसलेली आहे. अशी मानसिकता असणे चांगले आहे.‘मात्र खेळताना ही मानसिकता तुम्हाला हवा तसा निकाल देऊ शकत नाही. क्लाइव्ह लॉईड, माल्कम मार्शल, विव्हियन रिचर्ड्स, ॲन्डी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग, जोएल गॉर्नर यांची कारकीर्द वेस्ट इंडीजचा सुवर्णकाळ होता. त्यावेळी मोजके पैसे मिळायचे. आज वेस्ट इंडीजचे खेळाडू; मग ते कसोटी किंवा टी-२० खेळाडू असोत, जगभरातील खेळाडू असोत; त्यांना केंद्रीय करारानुसार निश्चित रक्कम मिळते. 

 

टॅग्स :सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App