PBKS vs LSG, IPL 2023 Live: लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मोहालीमध्ये सामना सुरू आहे. पंजाबने टॉस जिंकून गोलंदीजाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने पंजाबसमोर IPL इतिहासातील सर्वात मोठे 258 धावांचे लक्ष्य उभारले. लखनौकडून काइल मायर्स आणि मार्कस स्टॉयनस यांनी अर्धशतकीय खेळी केली, तर आयुष बदोनी(43) आणि निकोलस पूरन(45) यांनीही धुतले.
हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पंजाबचा संघ मैदानात उतरला असून, पंजाबची अतिशय संथ सुरुवात झाली आहे. तसेच, पंजाबला दुसरा झटकाही बसला आहे. कर्णधार शिखर धवन अवघ्या 1 रनावर आउट झाला. मार्कस स्टॉयनसच्या चेंडूवर कृणाल पांड्याने त्याची झेल घेतली. यानंतर प्रभसिमरन सिंग नवीन हकच्या डॅनियल सॅमच्या हाती झेलबाद झाला.
लखनौकडून केएल राहुल आणि मायर्स सलामीला उतरले आणि लखनौला चांगली सुरुवात करुन दिली. पण, चौथ्या ओव्हरमध्येच राहुल अवघ्या 12 धावांवर आउट झाला. यानंतर बदोनी आणि मायर्स यांनी संघाला पुढे नेले. आयुष बदोनीने याने 24 चेंडूत 43 तर काइल मायर्सने 24 चेंडूत 54 धावा कुटल्या. हे मायर्सचे यंदाचे चौथे अर्धशतक आहे.
मायर्स आउट झाल्यानंतर मार्कस स्टॉयनस आला आणि त्यानेही पंजाबला धुवायला सुरुवात केली. त्याने बदोनीसोबत 89 धावांची भागीदारी केली. बदोनी आउट झाल्यानंतर मार्कसने निकोलस पूरनसोबत पंजाबला पळताभुई आणली. मार्कसने 40 चेंडूत 72 धावांची खेळी केली. तसेच, निकोलस पूरननेही 19 चेंडूत 45 धावा कुटल्या. विशेष म्हणजे, लखनौने पॉवरप्लेमध्ये 74 तर अवघ्या 10 षटकांत 100 चा आकडा पार केला आहे. पंजाबकडून रबाडाने 2 तर अर्शदीप, सॅम करन आणि लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.
Web Title: PBKS vs LSG, IPL 2023 Live: First blow to Punjab Kings; Skipper Shikhar Dhawan is out for just 1 run
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.