PBKS vs LSG, IPL 2023 Live:लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने IPL च्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा स्कोअर केला. काइल मायर्स, मार्कस स्टॉयनस, आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर लखनौने पंजाबला 258 धावांचे आव्हान दिले होते.
पण, पंजाबचा संघ 201 धावांवर ऑल आउट झाला. 258 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबची खराब सुरुवात झाली. कर्णधार शिखर धवन अवघ्या 1 रनावर आउट झाला. यानंतर प्रभसिमरनही(9) स्वतात माघारी परतला. दोन विकेटनंतर पंजाबकडून मराठमोळ्या अथर्व तायडे आणि सिंकदर रजाने चांगली खेळी केली. तायडेने पंजाबसाठी 66 तर सिंकदरने 36 धावांची खेळी केली.
पण, या दोघांशिवाय कुणालाही चांगली खेळी करता आली नाही. पंजाबसाठी लिव्हिंगस्टने 23, सॅम करण 21, जितेश शर्माने 24 धावा केल्या. याशिवाय इतर कुणालाही दोनचा आकडा पार करता आला नाही. लखनौकडून यश ठाकूरने 4, नवीन हकने 3, रशि बिश्नोईने 2 तर मार्कस स्टॉयनसने 1 विकेट घेतली.
लखनौची 'जायंट' खेळीलखनौकडून मार्कस स्टॉयनसने 40 चेंडूत 72, काइल मायर्सने 24 चेंडूत 54, निकोलस पूरननेही 19 चेंडूत 45 आणि आयुष बदोनीने 24 चेंडूत 43 धावा कुटल्या. लखनौची सुरुवातच अतिशय दमदार झालीहोती. पॉवरप्लेमध्ये 74 तर अवघ्या 10 षटकांत 100 चा आकडा पार केला होता. पंजाबकडून रबाडाने 2 तर अर्शदीप, सॅम करन आणि लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.