Join us  

PBKS vs LSG, IPL 2023 Live: मायर्स, मार्कस, पूरन, बदोनी; चौघांनी धु-धु धुतलं, पंजाबसमोर उभारला तब्बल 258 धावांचा डोंगर

PBKS vs LSG, IPL 2023 Live: लखनौच्या चार खेळाडूंनी पंजाबच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. IPL 2023 मधील सर्वाधिक धावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 9:26 PM

Open in App

PBKS vs LSG, IPL 2023 Live: पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मोहालीमध्ये सामना सुरू आहे. पंजाबने टॉस जिंकून गोलंदीजाचा निर्णय घेतला, तर प्रथम फलंदाजी करताना लखनौने पंजाबला धू-धू धुतला. कर्णधार केएल राहुल स्वस्तात आउट झाला, पण नंतर काइल मायर्स आणि मार्कस स्टॉयनस यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर लखनौने पंजाबसमोर 258 डोंगर उभारला आहे. 

केएल राहुल आणि मायर्स सलामीला उतरले आणि सुरुवातीपासूनच पंजाबला धुवायला सुरुवात केली. पण, चौथ्या ओव्हरमध्येच राहुल अवघ्या 12 धावांवर आउट झाला. यानंतर बदोनी आणि मायर्स यांनी संघाला पुढे नेले. आयुष बदोनीने याने 24 चेंडूत 43 तर काइल मायर्सने 24 चेंडूत 54 धावा कुटल्या. हे मायर्सचे यंदाचे चौथे अर्धशतक आहे.

मायर्स आउट झाल्यानंतर मार्कस स्टॉयनस आला आणि त्यानेही पंजाबला धुवायला सुरुवात केली. त्याने बदोनीसोबत 89 धावांची भागीदारी केली. बदोनी आउट झाल्यानंतर मार्कसने निकोलस पूरनसोबत पंजाबला पळताभुई आणली. मार्कसने 40 चेंडूत 72 धावांची खेळी केली. तसेच, निकोलस पूरननेही 19 चेंडूत 45 धावा कुटल्या. विशेष म्हणजे, लखनौने पॉवरप्लेमध्ये 74 तर अवघ्या 10 षटकांत 100 चा आकडा पार केला आहे. पंजाबकडून रबाडाने 2 तर अर्शदीप, सॅम करन आणि लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. 

पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), अर्थव ताइडे, सिकंदर रजा, लियम लिविंगस्टन, सैम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह.

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार),काइल मायर्स, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बढोनी, नवीन उल हक, रवि बिश्नोई, आवेश खान, यश ठाकुर. 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सपंजाब किंग्स
Open in App