आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) अखेर यंदा ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आयसीसीच्या या निर्णयाची चातकासारखी प्रतीक्षा पाहत होते. आता बीसीसीआयचा इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) तेरावा मोसमाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, आयसीसीनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्याचे जाहीर करताना 2023मध्ये भारतात होणारा वर्ल्ड कप सहा महिन्यांनी पुढे ढकलला आहे. आता या निर्णयामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येत आहे.
आयसीसीनं 2021 आणि 2022च्या वर्ल्ड कपच्या आयोजकांची नावं जाहीर केलेली नाहीत. कोरोना व्हायरसची परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आयसीसीनं स्पष्ट केलं. त्याचवेळी आयसीसीनं 2023चा वन डे वर्ल्ड कप सहा महिन्यांनी पुढे ढकलला आहे. भारतात होणारा हा वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवण्यात येणार होता, परंतु आता तो ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपसाठी अन्य संघांना पात्रता फेरी खेळण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे, असे सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार 2023च्या वर्ल्ड कप पुढे ढकलण्यामागे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा ( पीसीबी) हात असल्याचे समोर येत आहे. पीसीबीचे प्रमुखे एहसान मणी यांनी आयसीसीकडे तशी विनंती केली होती. पाकिस्तान सुपर लीगसाठी ( पीएसएल) वन डे वर्ल्ड कप पुढे ढकलावा, अशी विनंती आयसीसीकडे करण्यात आली होती. त्यामुळे पुढील तीन वर्ष फेब्रुवारी-मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होणार नाहीत. या कालावधीत पीएसएल खेळवण्यात येणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Love Story; हिंदू मुलीसोबत लग्न करण्यासाठी सोडलं पाकिस्तान अन् बनला यशस्वी क्रिकेटपटू!
ICCच्या 'त्या' निर्णयामुळे महेंद्रसिंग धोनीसह 7 दिग्गज खेळू शकणार नाहीत वर्ल्ड कप!
हिमेश रेशमियाच्या गाण्यावर हसीन जहाँनं तयार केला व्हिडीओ; नेटिझन्सनं विचारला 'भन्नाट' प्रश्न
Video: मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 'Sea lion'; पुढे जे घडलं तुम्हीच पाहा...
भाजपा प्रवेशानंतर 24 तासांतच खेळाडूनं घेतला राजकारणातून संन्यास!
"...तर कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसाला लाखाच्या घरात जाईल, कुणाला काळजी आहे का?"
OMG: लाईव्ह सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल