पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वासीम खान यांनी शनिवारी 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं विधान करून क्रिकेटविश्वात खळबळ माजवली होती. आगामी आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि त्यात टीम इंडिया न खेळल्यास 2021साली भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधून माघार घेऊ, असं विधान खान यांनी केले होते. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. पण, हे विधान अंगलट आल्याचे कळताच खान यांनी यू टर्न मारला आहे. त्यांनी त्या विधानाचे खंडन केले.
आशियाई क्रिकेट परिषदेनं यंदाच्या आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे. पण, पाकिस्तानशी राजकीय संबंध लक्षात घेता टीम इंडियानं तेथे खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेनं स्पष्टता मांडावी, अशी मागणी पीसीबीनं केली आहे. खान यांनी भारतानं त्यांचे सामना तटस्थ ठिकाणी खेळावेत, असे सांगितले.
ते म्हणाले,''भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. आम्हाला यजमानपद मिळाल्यापासूनच आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेनं याबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. आशिया कप स्पर्धा संपूर्ण पाकिस्तानच व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे भारतानं सामने कुठे खेळावे, याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेनं घ्यावा.''
''जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाल्यास, तो कुठे खेळवला जाईल याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेनं घ्यावा. स्पर्धेच्या फॉरमॅटबाबत अजूनही चर्चा सुरू झालेली नाही, परंतु अंतिम निर्णय आशियाई क्रिकेट परिषद घेईल,'' असेही खान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खान यांनी 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप वरील बहिष्काराच्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले,''असं होणं शक्य नाही. पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर जाणार नाही, असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही. जे विधान होतं ते आशिया कप संदर्भातील होतं.''
IND Vs NZ, 2nd T20I : प्रजासत्ताक दिनी टीम इंडिया विजयी तिरंगा फडकावणार; सामना कधी व कुठे होणार?
IND Vs NZ, 2nd T20I : टीम इंडियात बदलाचे वारे, दुसऱ्या सामन्यात असे असतील अंतिम अकरा शिलेदार
खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय?
टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार!
IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम
IND vs NZ : जसप्रीत बुमराहला दुखापत, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात बसू शकतो धक्का?
BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल