पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा यांनी सोमवारी भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिके संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत-पाक क्रिकेट सीरिज होणार का? याबाबत राजा यांना विचारण्यात आलं असता त्यांनी याबाबत सध्यातरी कोणतीही शक्यता नाही, असं विधान केलं आहे. भारत-पाक मालिके संदर्भात सध्यातरी कोणताही विचार नाही. कारण सध्या माझं लक्ष फक्त देशांतर्गत क्रिकेटला बळकटी देण्याकडे असणार आहे, असं रमीज राजा म्हणाले.
टीम इंडियाच्या 'प्रामाणिकतेवर' इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उपस्थित केला प्रश्न; विराट कोहलीचं नाव घेऊन मोठा दावा!
पाकिस्तानचे माजी कर्णधार राहिलेल्या रमीज राजा यांची पाक बोर्डाच्या सदस्यांनी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सोमवारी त्यांनी औपचारिकरित्या पीसीबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. पीसीबीचं अध्यक्षपद क्रिकेटमधील सर्वात कठीण भूमिकेपैकी एक असल्याचं राजा म्हणाले. "नवी जबाबदारी नक्कीच आव्हानात्मक आहे. पंतप्रधान इम्रा खान यांनी मला ही जबाबदारी दिली जाण्यापूर्वी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती", असंही राजा म्हणाले.
धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO
भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळविण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता रमीज राजा यांनी सध्यातरी अशी मालिका होणं शक्य नसल्याचं म्हटलं. "सध्यातरी अशा कोणत्याही मालिकेची शक्यता नाही. राजकारणामुळे क्रिकेटवर खूप वाईट परिणाम झाला आहे आणि सध्याची स्थिती काही बदललेली नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही गडबड आम्हाला करायची नाही. सध्या आम्हाला फक्त देशांतर्गत क्रिकेटवरच लक्ष केंद्रीत करायचं आहे", असं रमीज राजा म्हणाले.
रमीज राजा यांनी यावेळी रावळपिंडी आणि लाहोर येथे खेळविण्यात येणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत डीआरएस प्रणालीची सुविधा उपलब्ध नसण्याच्या मुद्द्यावरही नाराजी व्यक्त केली. "डीआरएसमुळे निर्णयात कोणती गडबड तर नाही ना याची खात्री करता येते. त्यामुळे या मुद्द्यावर मी लक्ष देणार आहे", असं राजा म्हणाले.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्याबाबत विचारण्यात आलं असता रमीज राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंसोबत चर्चा झाल्याचं म्हटलं. यंदा नवं समीकरणं मैदानात दिसायला हवं आणि या सामन्यासाठी आपल्याला शंभर टक्के तयार राहायला हवं. चांगल्या कामगिरीसाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवेत, असं खेळाडूंना सांगितलं असल्याचं ते म्हणाले. संघातील स्थानाबाबत जास्त काळजी करण्यापेक्षा बिनधास्त होऊन खेळण्याकडे खेळाडूंनी भर द्यावा, असंही ते म्हणाले आहेत.
Web Title: pcb chief ramiz raja dismisses bilateral with team india declares its impossible right now
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.