कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल ) चा 13 वा मोसम स्थगित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास त्या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) कंबर कसली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 25 सप्टेबंर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. पण, बीसीसीआयच्या योजनेवर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळ ( पीसीबी) पाणी फिरवण्याच्या तयारीत आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणे यंदा आशिया चषक ( ट्वेंटी-20) होणार आहे. पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद मिळालं आहे, परंतु भारताच्या विरोधामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती किंवा श्रीलंकेत खेळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीसीबीनं आयपीएल 2020साठी आशिया चषक स्पर्धेबाबत कोणतिही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात आशिया चषक होणार आहे.
पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,''कोणत्यातरी स्थानिक स्पर्धेसाठी आशिया चषक स्पर्धेचा बळी कसा दिला जाऊ शकतो. पीसीबी तसे होऊ देणार नाही. आशिया चषक स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच खेळवली जाईल. पीसीबीसाठी आर्थिकदृष्ट्याही या स्पर्धेचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे आमची भूमिका ठाम आहे. आशिया चषक सप्टेंबरमध्येच झाला पाहिजे आणि फक्त खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर ती रद्द करण्यास आमची परवानगी असेल. आयपीएलसाठी आशिया चषकाच्या वेळापत्रकात बदल, आम्ही खपवून घेणार नाही.''
दरम्यान, यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे, पण भारतीय संघाचा तेथे जाण्यास विरोध आहे. अशात पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) आशिया चषक आयोजनाचा हट्ट सोडल्याचे वृत्त GeoSuper या वेबसाईटनं दिलं आहे. पीसीबी आणि श्रीलंका क्रिकेट यांनी आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा आशिया चषक हा श्रीलंके होणार असल्याचा दावा या वेबसाईटनं केला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत कोरोना व्हायरसच्या संकटात संयुक्त अरब अमिरातीपेक्षा श्रीलंका हा सुरक्षित पर्याय असल्याचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेटनं ठेवला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
प्रेग्नंट प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी हार्दिक पांड्याची खटपट; स्पेशल गिफ्ट पाहून नताशा म्हणते...
भारतीयांवर भडकली 'पॉर्न स्टार' रेनी ग्रेसी; दिली कायदेशीर कारवाईची धमकी!
माझं घरच तू होतीस गं... आईच्या निधनानंतर SRHच्या क्रिकेटपटूला दुःख अनावर
सुशांत सिंग राजपूतला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही; मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला भावनिक
भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीच्या डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार, पण...
रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट!
हरभजन सिंग जगासमोर भारताची नकारात्मक छबी पसरवतोय; चिनी पत्रकाराची टीका
Web Title: PCB firm over not compromising on Asia Cup for the IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.