Join us  

पाकिस्तानचा फलंदाज डोपिंगमध्ये अडकला, चार महिन्यांसाठी निलंबित

पाकिस्तानचा सलामीवीर अहमज शेहजाद हा डोपिंग प्रकरणात दोषी आढळला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला चार महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 2:20 PM

Open in App

लाहोर : पाकिस्तानचा सलामीवीर अहमज शेहजाद हा डोपिंग प्रकरणात दोषी आढळला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला चार महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निलंबन 10 जुलैपासून सुरू झाल्याचे पीसीबीने स्पष्ट केले आहे. त्याने उत्तेजक सेवन विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात स्पष्ट झाले. 

पाकिस्तानमधील स्थानिक सामन्यांत त्याने बंदी घातलेले द्रव्य सेवन केले होते आणि त्याने त्याची कबुलीही दिली आहे. मात्र याचवेळी हे कृत्य आपण जाणीवपूर्वक केलेले नसल्याचे त्याने सांगितले.  शेहजादने 13 कसोटी, 81 वन डे आणि 57 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्याच्या नावावर 982 धावा, वन डेत 2605 धावा आणि ट्वेंटी-20 मध्ये 1454 धावा आहेत. त्याच्यावरील बंदी 10 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. 

 

टॅग्स :पाकिस्तान