मागील ४-५ दिवसांत पाकिस्तान क्रिकेटमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करताच मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल-हक आणि गोलंदाज प्रशिक्षक वकार युनिस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पण, आजचा दिवस हा पाकिस्तान क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी अखेर माजी खेळाडू रमीज राजा ( Ramiz Raja) यांनी अधिकृत निवड झाली. १९९२च्या वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तानच्या संघाचे सदस्य असलेले राजा हे PCBचे ३६ वे अध्यक्ष आहेत.
Big Breaking : विराट कोहलीची कर्णधारपदावरून गच्छंती?; BCCIनं सांगितलं टीम इंडियाचा कर्णधार कोण...
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडन याची निवड झाली आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज वेर्नोन फिलेंडर गोलंदाज प्रशिक्षक असणार आहे. ( Matthew Hayden & Vernon Philander are the coaches of Pakistan in the T20 World Cup 2021 at UAE). ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत या अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन पाकिस्तान संघाला मिळणार असल्याचे त्यांचे चाहते खूश झाले आहेत.