नवी दिल्ली : आशिया चषकाची (Asia Cup 2022) स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. यूएईच्या (UAE) धरतीवर पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी संघ दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. या बहुचर्चित स्पर्धेपूर्वी पाकिस्तानच्या (Pakistan) संघाला शाहिन आफ्रिदीच्या रूपात मोठा झटका बसला. कारण दुखापतीच्या कारणास्तव शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) आशिया चषकातून बाहेर झाला आहे. मात्र तो पाकिस्तानच्या संघासोबत यूएईत दाखल झाला आहे. साहजिकच संघात नसतानाही आफ्रिदी यूएईला गेल्यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. यावर आता खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. माहितीनुसार, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या सांगण्यावरून शाहिन आफ्रिदीला संघासोबत यूएईला नेण्यात आले आहे. आफ्रिदी संघासोबत राहिल्याने त्याच्यावर दुबईत योग्य उपचार करता येतील असा पाकिस्तानी संघाचा समज आहे. "बाबरची इच्छा होती की आफ्रिदीने संघासोबत राहावे. अशाने डॉक्टरांना त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवता येईल. त्यामुळे तो दुबईतच संघासोबत राहणार आहे', असे पीसीबीच्या प्रवक्त्याने पाकिस्तानातील स्थानिक मीडियाला सांगितले.
आशिया चषक २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक
- पहिला सामना - २७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - दुबई
- दुसरा सामना - २८ ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान - दुबई
- तिसरा सामना - ३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - शारजा
- चौथा सामना - ३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंगकॉंग - दुबई
- पाचवा सामना - १ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - दुबई
- सहावा सामना - २ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग - शारजा
- सातवा सामना - ३ सप्टेंबर - बी१ विरुद्ध बी२ - शारजाह
- आठवा सामना - ४ सप्टेंबर - ए१ विरूद्ध ए२ - दुबई
- नववा सामना - ६ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी१ - दुबई
- दहावा सामना - ७ सप्टेंबर - ए२ विरुद्ध बी२ - दुबई
- अकरावा सामना - ८ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी२ - दुबई
- बारावा सामना - ९ सप्टेंबर - बी१ विरूद्ध ए२ - दुबई
- अंतिम सामना - ११ सप्टेंबर - १ ल्या सुपर ४ मधील पहिला विरूद्ध दुसऱ्या ४ मधील पहिला - दुबई
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.