Asia Cup 2023 चा वाद मिटला, फॉरमॅट ठरला? जाणून घ्या भारतीय संघ कुठे खेळणार  

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला जाहीर झाल्यापासून वाद होणार हे निश्चित होतेच.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 03:15 PM2023-05-20T15:15:29+5:302023-05-20T15:15:48+5:30

whatsapp join usJoin us
PCB’s proposed hybrid hosting model for the Asia Cup 2023 is likely to get a final nod from participating teams, including India | Asia Cup 2023 चा वाद मिटला, फॉरमॅट ठरला? जाणून घ्या भारतीय संघ कुठे खेळणार  

Asia Cup 2023 चा वाद मिटला, फॉरमॅट ठरला? जाणून घ्या भारतीय संघ कुठे खेळणार  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला जाहीर झाल्यापासून वाद होणार हे निश्चित होतेच. BCCI ने भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे जाहीर केले अन् पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे धाबे दणाणले. वेगवेगळ्या धमक्या देऊन BCCIला निर्णय बदलण्याचा प्रयत्न PCB कडून केला गेला, परंतु जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेनं धमक्यांना भिक घातली नाही. PCB ने दोन पर्याय सूचवले आणि त्यापैकी दुसरा हायब्रिड मॉडल मंजूर होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त समोर येत आहे. आशियाई क्रिकेट परिषद ( ACC) काही दिवसांत अंतिम निर्णय जाहीर करेल. या वेळी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन भागात होणार आहे . पहिला टप्पा पाकिस्तानमध्ये आणि दुसरा टप्पा अन्य कुठेतरी खेळवण्यात येईल. 


संयुक्त अरब अमिराती (UAE) हे आशिया चषक २०२३ च्या अंतिम टप्प्याचे आयोजन करण्यासाठी दुसरे ठिकाण म्हणून सांगितले जात असताना, सहभागी संघांना कडक उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे या स्थानाबद्दल थोडेसे घाबरले आहेत. बीसीसीआय आणि  पीसीबी  पाकिस्तानमध्ये आशिया चषक खेळण्याच्या संदर्भात गोंधळात पडले होते. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंध लक्षात घेता, बीसीसीआयने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता.


पीसीबीने दोन हायब्रीड मॉडेल्सचा प्रस्ताव दिला होता, त्यातील पहिले मॉडेल इतर संघांनी नाकारले. त्यामध्ये युएई आणि पाकिस्तानला स्पर्धा खेळण्याचा प्रस्ताव होता. कोणत्याही संघांना सामन्यांसाठी यूएईला जाण्याची डोकेदुखी नको होती.  PCB चे अध्यक्ष नजम सेठी यांनी नंतर एक नवीन मॉडेल मांडला. श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळ सारखे संघ त्यांचे सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये खेळतील आणि  भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होतील आणि त्यात बाद फेरी व अंतिम सामन्याचाही समावेश आहे.  या मॉडेलला अंतिम होकार मिळेल. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे यजमानपद कोणता देश घेतो हे पाहणे बाकी आहे.
 

Web Title: PCB’s proposed hybrid hosting model for the Asia Cup 2023 is likely to get a final nod from participating teams, including India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.