शिखर, लोकेशची क्रमवारीत झेप!

भारताला एक डाव आणि १७१ धावांनी दणदणीत विजयासह मालिका ३-० अशी निर्विवादपणे जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिलेल्या शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत मोठी झेप घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 03:52 AM2017-08-16T03:52:59+5:302017-08-16T03:53:02+5:30

whatsapp join usJoin us
Peak, Lokesh's jump in the rankings! | शिखर, लोकेशची क्रमवारीत झेप!

शिखर, लोकेशची क्रमवारीत झेप!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताला एक डाव आणि १७१ धावांनी दणदणीत विजयासह मालिका ३-० अशी निर्विवादपणे जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिलेल्या शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फलंदाजांनी आपल्या कारकिर्दीत सर्वोत्तम वैयक्तिक मानांकन मिळवले आहे.
पल्लेकल कसोटीमध्ये ११९ धावांची शानदार खेळी केलेल्या धवनने १० स्थानांची झेप घेताना २८वे स्थान मिळवले आहे. दिल्लीच्या या स्टार फलंदाजाने मालिकेत दोन शतकांसह सर्वाधिक ३५८ धावा काढल्या. या जोरावर धवनने मालिकावीराच्या किताबावरही कब्जा केला. त्याचवेळी धवनसह पहिल्या विकेटसाठी १८८ भागीदारी करत ८५ धावांचे योगदान दिलेल्या लोकेश राहुलने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम नववे स्थान मिळवले आहे. राहुलचे सध्याचे रेटिंग ७६१ असून हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे. मालिकेत विशेष लक्ष वेधलेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याने तब्बल ४५ स्थानांची मोठी झेप घेताना फलंदाजांच्या क्रमवारीत ६८वे स्थान मिळवले आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये मोहम्मद शमीने एका स्थानाने आपला क्रमांक सुधारताना १९वा क्रमांक मिळवला आहे. तसेच, उमेश यादवलाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता २१ व्या स्थानी पोहोचला आहे. उमेशची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. त्याचबरोबर भारत आणि श्रीलंकेच्या चायनामन गोलंदाजांनीही आपल्या स्थानांमध्ये प्रगती केली आहे. तिसºया सामन्यात रवींद्र जडेजाच्या जागी स्थान मिळालेल्या कुलदीप यादवने ६ बळी घेत आपली छाप पाडली. या कामगिरीच्या जोरावर त्याने २९ स्थानांनी झेप घेताना ५८वे स्थान पटकावले. तसेच, श्रीलंकेचा सनदाकन याने १६ स्थानांची झेप घेताना ५७वा क्रमांक पटकावला आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांमध्ये कर्णधार दिनेश चंदिमल याने दोन स्थानांनी सुधारणा करताना ३३ वे स्थान मिळवले आहे. (वृत्तसंस्था)
>अष्टपैलू रवींद्र जडेजाने
अव्वल स्थान गमावले
लंकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू छाप पाडलेल्या रवींद्र जडेजाला तिसºया कसोटीतील निलंबनाचा फटका बसला आहे. आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतील जडेजाने आपले संयुक्त अग्रस्थान गमावले असून आता बांगलादेशचा शाकिब अल हसन ४३१ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर शाकिबहून एका गुणाने पिछाडीवर पडलेला जडेजा द्वितीय स्थानी आहे. त्याच वेळी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये मात्र जडेजाने आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.
>भारताचे अग्रस्थान मजबूत
सांघिक क्रमवारीमध्ये भारताने आपले अग्रस्थान आणखी मजबूत केले आहे. त्याचबरोबर श्रीलंकेलाही आपले सातवे स्थान कायम राखण्यात यश आले आहे. दरम्यान, भारताला दोन गुणांचा फायदा झाला असून या जोरावर भारताने
125
गुणांसह द्वितीय स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला १५ गुणांनी पिछाडीवर टाकले आहे. तसेच, इंग्लंडला आपले तिसरे स्थान कायम राखण्यास गुरुवारपासून सुरू होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकावी लागेल.

Web Title: Peak, Lokesh's jump in the rankings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.