काश्मीरमध्ये महेंद्रसिंग धोनीसमोर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

भारतीय लष्कराकडून या प्रीमिअर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. धोनीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पण महेंद्रसिंग धोनी पोहोचताच काही लोकांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 12:41 PM2017-11-27T12:41:31+5:302017-11-27T13:14:02+5:30

whatsapp join usJoin us
People started chanting Shahid Afridi in front of Mahendra Singh Dhoni in Kashmir | काश्मीरमध्ये महेंद्रसिंग धोनीसमोर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

काश्मीरमध्ये महेंद्रसिंग धोनीसमोर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या काश्मीरमध्ये आहेचिनार क्रिकेट प्रीमिअर लीगसाठी धोनी प्रमुख पाहुणा म्हणून काश्मीरमध्ये आला आहेमहेंद्रसिंग धोनी पोहोचताच काही लोकांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली

श्रीनगर - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या काश्मीरमध्ये आहे. रविवारी महेंद्रसिंग धोनी काश्मीरमध्ये पोहोचला. चिनार क्रिकेट प्रीमिअर लीगसाठी धोनी प्रमुख पाहुणा म्हणून काश्मीरमध्ये आला आहे. भारतीय लष्कराकडून या प्रीमिअर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. धोनीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पण महेंद्रसिंग धोनी पोहोचताच काही लोकांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओही व्हायरल होऊ लागला आहे. याच कार्यक्रमात महेंद्रसिंग धोनीने भारत - पाकिस्तान क्रिकेटवर आपलं मत व्यक्त केलं होतं. 

भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेवर बोलताना धोनीने सांगितलं होतं की, 'भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिकेचं आयोजन व्हावं की नाही, याबाबतचा निर्णय सरकार चांगल्या प्रकारे करु शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या क्रिकेट मालिका हा फक्त खेळ नसून आणखी खूप काही आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हातात आहे'.

पुढे बोलताना त्याने सांगितलं की, 'दहशतवाद आणि क्रिकेट एकाच वेळी होऊ शकत नाही, बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कुठलाही प्रस्ताव देण्याआधी केंद्र सरकारशी चर्चा करावी, अशी ठाम भूमिका भारतीय सरकारनं गेल्या काही वर्षापासून घेतलेली आहे. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धेव्यतिरिक्त भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कोणताही सामना होत नाही'.

याआधी पाकिस्ताननं 2012-13 मध्ये भारताचा दौरा केला होता. दोन टी-20 आणि तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये पाकिस्ताननं वनडे सीरिज जिंकली तर टी-20 सीरिज बरोबरीत सुटली. त्यानंतर अजूनही भारत-पाकिस्तानमध्ये सीरिज झालेली नाही. 2014 मध्ये बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत करार केला होता. 2015 ते 2023 पर्यंत भारत पाकिस्तान सहा सीरिज खेळेल, असं या करारात नमुद करण्यात आलं होतं. पण भारत-पाकिस्तानमधल्या संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये अजून एकही सीरिज होऊ शकली नाही.

पाकिस्तानविरुद्ध बीसीसीआयची व्यूहरचना - 
आगामी काळातील दौऱ्यांच्या नियोजन बैठकीत बीसीसीआय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एकट पाडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी वर्षांमधल्या दौऱ्यांचं नियोजन करण्यासाठी आयसीसीची 7 आणि 8 डिसेंबरला सिंगापूरमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय भारतीय संघ; ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश या सहा संघांविरुद्ध मालिका खेळण्यासाठी तयार असल्याचं सांगणार असल्याचं कळतंय. याचसोबत बीसीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या करारानूसार दोन देशांमधले सामने रद्द करुन घेण्याकडेही बीसीसीआयचा कल असण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि सचिव अमिताभ चौधरी आयसीसीच्या या बैठकीला हजेरी लावणार असल्याचं समजतंय. 
 

Web Title: People started chanting Shahid Afridi in front of Mahendra Singh Dhoni in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.