नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आता नव्या वादात अडकला आहे. सोमवारी रात्रीपासून सोशल मीडियावरयुवराज सिंगला माफी मागण्यास सांगितले जात आहे. युवराज सिंगने एक अपशब्द वापरला. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज झाले आहेत.
युवराज सिंग हा इंस्टाग्रामवर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मासोबत लाईव्ह चॅट करत होता. त्यावेळी त्याने एक जातिवाचक शब्दाचा वापर केला. त्यानंतर ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो असा ट्रेंड सुरू झाला आहे.
दरम्यान, ज्या लाईव्ह चॅटवरून वाद सुरू झाला आहे. ते लाईव्ह चॅट खूप जुने आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांच्यात लाईव्ह सेशन झाले होते. त्यावेळी दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट, कोरोना आणि इतर विषयांवर चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव यांचा उल्लेख होता.
युवराज सिंगने त्यावेळी बोलता बोलता मस्करीत युजवेंद्र चहलबद्दल जातिवाचक शब्द उच्चारला. मात्र, या दोन खेळाडूंमध्ये हे मस्करीत केलेले चॅट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. यावरून नेटकऱ्यांनी युवराज सिंगला धारेवर धरले आहे. तसेच, युवराज_सिंह_माफी_मांगो अशी मागणी ट्विटर केली आहे.