Join us  

"लोक टीका करतील तू दुर्लक्ष कर, तुझ्या वडिलांसोबतही हे झालंय", ब्रेट लीचा अर्जुनला सल्ला

brett lee on arjun tendulkar : मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकरने यंदाच्या आयपीएलमधून नव्या अध्यायाची सुरूवात केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 7:50 PM

Open in App

arjun tendulkar ipl 2023 । मुंबई : मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकरने यंदाच्या आयपीएलमधून (IPL 2023) नव्या अध्यायाची सुरूवात केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात ज्युनिअर तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने एकाच षटकात ३१ धावा दिल्यानंतर तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. याशिवाय त्याची गती यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने अर्जुनचे समर्थन केले असून त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.

अर्जुन १४० प्रति तास वेगाने गोलंदाजी करू शकतो असे लीने म्हटले आहे. अर्जुनने आतापर्यंत ३ आयपीएल सामने खेळले असून २ बळी घेतले आहेत. सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने २० धावांचा बचाव करण्यासाठी अखेरचे षटक अर्जुनला दिले होते. अर्जुनने संघाला विजय मिळवून दिलाच शिवाय भुवनेश्वर कुमारच्या रूपात आयपीएलमध्ये पहिला बळी देखील पटकावला. मात्र, यानंतरच्या सामन्यात अर्जुनने पंजाबविरूद्ध ३ षटकांत ४८ धावा दिल्या.

अर्जुनने टीकाकांराकडे दुर्लक्ष करावे - ब्रेट ली"सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुनकडे अखेर षटकामध्ये बचावाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा त्याने मुंबई इंडियन्ससाठी सामना जिंकून दिला. हा त्याच्यासाठी खूप मोठा अनुभव असावा. तो सतत शिकत असतो. याशिवाय पुढच्या सामन्यात त्याने धावा दिल्या पण ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये असेच घडते. या फॉरमॅटमध्ये असेच घडते, असे मी नेहमीच म्हटले आहे. माझ्यासोबत देखील अनेक वेळा झाले. म्हणूनच तुम्हाला तुमच्या भावना बाहेर ठेवाव्या लागतील", असे ब्रेट लीने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटले.

तसेच लोक प्रत्येक गोष्टीवरून टीका करत असतात. तुम्ही संदीप शर्माला पाहा, तो १२० प्रति तास वेगाने गोलंदाजी करतो आहे. अर्जुन त्याहून अधिक गतीने गोलंदाजी करत आहे. तो आता केवळ २३ वर्षांचा असून त्याच्याकडे संपूर्ण करिअर आहे. मी त्याला एवढाच सल्ला देईन की, टीकाकारांकडे लक्ष देऊ नको. त्याच्या वडिलांसोबत देखील सुरूवातीला हे असेच झाले होते. तो संघासोबत रूळत गेला की मग १४० प्रति तास वेगाने देखील गोलंदाजी करेल, असे ब्रेट लीने अधिक सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सआॅस्ट्रेलियाअर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकर
Open in App