Cheteshwar Pujara Century : चेतेश्वर पुजाराचे शतक, वॉशिंग्टन सुंदरच्या 4,तर नवदीप सैनीच्या 3 विकेट्स; पहिल्या दिवशी भारतीयांचे वर्चस्व Video 

Cheteshwar Pujara Century County Championship : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याचा इंग्लंडमधील फॉर्म हा भन्नाट सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:39 AM2022-07-20T11:39:30+5:302022-07-20T11:40:03+5:30

whatsapp join usJoin us
Performance of Indian players on Day 1 in this County Championship : Cheteshwar Pujara hit Century, Washington Sunder and Navdeep Saini take 4 & 3 wickets respectivly, Video  | Cheteshwar Pujara Century : चेतेश्वर पुजाराचे शतक, वॉशिंग्टन सुंदरच्या 4,तर नवदीप सैनीच्या 3 विकेट्स; पहिल्या दिवशी भारतीयांचे वर्चस्व Video 

Cheteshwar Pujara Century : चेतेश्वर पुजाराचे शतक, वॉशिंग्टन सुंदरच्या 4,तर नवदीप सैनीच्या 3 विकेट्स; पहिल्या दिवशी भारतीयांचे वर्चस्व Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Cheteshwar Pujara Century County Championship : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याचा इंग्लंडमधील फॉर्म हा भन्नाट सुरूच आहे. कसोटी संघातून वगळल्यानंतर कौंटी चॅम्पियनशीप खेळण्यासाठी पुजारा इंग्लंडमध्ये दाखल झाला. त्याने ससेक्स ( Sussex) क्लबकडून यंदा ४ सामन्यांत दोन द्विशतकं व दोन शतकांसह १४३.४०च्या सरासरीने ७१७ धावा चोपल्या होत्या आणि त्यात मंगळवारी आणखी एका शतकाची भर पडली. नेतृत्वाची धुरा खांद्यावर सोपवल्यानंतर पुजाराने कर्णधार म्हणून ससेक्सकडून पहिले शतक झळकावले. केवळ पुजाराच नव्हे, कौंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर ( पदार्पण), नवदीप सैनी व उमेश  यादव या भारतीयांनीही काल वर्चस्व गाजवले.

ससेक्स विरुद्ध मिडलेसेक्स या सामन्यात पुजाराने शतकी खेळी केली. अली ओर ( 7) व टॉम क्लार्क ( 33) माघारी परतल्यानंतर पुजाराने टॉम अल्सोपसह ससेक्सचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी केली. टॉम 277 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीने 135 धावा करून माघारी परतला. पण, पुजारा दिवसभर खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभा राहिला. त्याने 182 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारांसह नाबाद 115 धावा केल्या आणि संघाला पहिल्या दिवशी 4 बाद 328 धावांचा पल्ला गाठून दिला.


लिसेस्टरशायर क्लबकडून कौंटी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने नॉर्थहॅम्टनशायरविरुद्ध पहिल्या दिवशी 20-1-69-4 अशी कामगिरी केली. त्यामुळे नॉर्थहॅम्टनशायरची अवस्था 7 बाद 218 धावा अशी झाली.   

वॉर्विकशायर क्लबकडून खेळणाऱ्या नवदीप सैनीने केंट क्लबविरुद्ध 10-2-59-3 अशी कामगिरी केली. उमेश यादवने 18-4-42-0 अशी कामगिरी केली. 

 

चेतेश्वर पुजाराची कामगिरी
6(15)
201*(387)
109(206)
12(22)
203(334)
16(10)
170*(197)

 

 

Web Title: Performance of Indian players on Day 1 in this County Championship : Cheteshwar Pujara hit Century, Washington Sunder and Navdeep Saini take 4 & 3 wickets respectivly, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.