जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे. 7 लाख रुग्ण बरेही झाले आहेत. त्यामुळे देशात अजूनही नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. अशात भारताचा माजी क्रिकेटपटू अन् समालोचक संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनमधून त्यांची विनोदबुद्धी जाणवते.
मांजरेकर यांनी त्यांच्या घरातील WiFi दुरुस्त करण्यासाठी टेक्नीशीयनला बोलावले. PPE किट घालून आलेला टेक्नीशीयन पाहून मांजरेकर यांनी ट्विट केलं. त्यांनी लिहिलं की,'' माझ्या घरातील WiFi दुरुस्तीसाठी थेट नासाहून टेक्नीशीयन आला.''
IPL 2020 च्या मार्गात आणखी एक विघ्न; BCCIने ठरवलेल्या तारखांवर ब्रॉडकास्टर नाराज, पण का?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना; आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा