भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा 'सर' रवींद्र जडेजा म्हणून जास्त ओळखला जातो. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं जडेजाला 'सर' ही उपाधी दिली. पण, धोनीनं दिलेलं हे नाव आवडत नसल्याचा खुलासा जडेजानं केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यानं यामागचं कारणही सांगितलं.
गुजरातच्या जामनगर शहरातून आलेला जडेजा आज जगभरात फेमस आहे. क्रिकेटनेच त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. २०१२च्या आयपीएल लिलावात सर्वात महागड्या खेळाडूचा मान त्यानं पटकावला होता. त्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली. जडेजा पुढे की,''क्रिकेटनं मला खुप काही दिलं. या खेळामुळेच मी अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकलो.''
तो म्हणाला,''माहीनं तीन-चार वर्षांपूर्वी ट्विट केलं होतं आणि त्यात त्यानं माझ्या नावापुढे 'सर' हे लावलं होतं. त्यानंतर मला सर्वजण सर रवींद्र जडेजा असे बोलवू लागले. पण, मला वैयक्तिक या उपाधीचा राग येतो. मला ही उपाधी आवडत नाही. मला माझ्या नावानं हाक मारा, असे मी नेहमी लोकांना सांगतो. हवं तर मला जड्डू म्हणा, तेही मला आवडेल. संघातील काही खेळाडू या उपाधीवरून माझी फिरकी घेतात. त्यात विराट कोहलीचाही समावेश आहे.''
आयपीएलमध्ये तो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो आणि धोनीच्या ताडक्या खेळाडूंपैकी तो एक आहे. आता धोनीनं दिलेलं नाव आवडत नसल्याचे सांगितल्यानंतर कॅप्टन कूल काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं लग्नात केली एक चूक, होऊ शकतो तीन वर्षांचा कारावास
Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का?
Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला