नवी दिल्ली: प्रसिद्ध डी.जे. कायगो सध्या भारत दौ-यावर आहे. अनेक ठिकाणी त्याचा सनबर्न शो होत आहे. रविवारी त्याने मायानगरी मुंबईत एक शो केला. भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली हा इलेक्ट्रॉनिक डान्स म्यूझिक (ईडीएम) चा मोठा चाहता आहे, हे तर सर्वश्रूत आहे. पण तो डी.जे. कायगो याचा देखील मोठा चाहता आहे. श्रीलंकेविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेमुळे त्याला कायगोच्या शोवर पाणी सोडावं लागलं. पण कोहलीने त्याला एक गिफ्ट पाठवलं. आपल्या आवडत्या डीजे साठी कोहलीने ए स्टार स्पीकर आणि हेडफोन्स पाठवले.
विराट कोहलीचं ईडीएमसाठी असलेलं प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी त्याने डीजे दिमित्री वेगास आणि लाइक माइकचं तोंडभरून कौतूक केलं होतं.
श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या कसोटीत विराटने दमदार प्रदर्शन करताना 18 महिन्यांनंतर द्विशतक झळकावलं. लंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर वन-डे आणि टी-20 मालिका होणार आहे.
कोहलीला वन-डे सामन्यांत विश्रांती-
भारतीय कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे; पण तो नवी दिल्ली येथे खेळल्या जाणा-या तिस-या कसोटीत खेळणार आहे.
पुढील महिन्यात मायदेशात खेळल्या जाणा-या वन-डे मालिकेत कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहलीला वन-डे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.’
भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यानंतर धरमशाला येथे १० डिसेंबरपासून तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. वनडे मालिकेसाठी पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे.
तिसरा व अखेरचा कसोटी सामना २ डिसेंबरपासून दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
भारत संघ : तिसरी कसोटी :-
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धीमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा व विजय शंकर.
वन-डे मालिका :- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर
कुमार व सिद्धार्थ कौल.
Web Title: The person's wish is Virat Kohli, who has not come to meet him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.