भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या अटकेसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच्यासह अभिनेत्री तमन्ना हिच्याही अटकेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईच्या घरात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांशी वारंवार संवाद साधत आहे. पण, शुक्रवारी धडकलेल्या या बातमीनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
चेन्नईच्या एका वकिलानं ही याचिका दाखल केली आहेत. विराट कोहली ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. युवकांमध्ये हे अॅपचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या अॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे. त्यात विराट कोहली आणि तमन्ना या सेलिब्रेटी अशा अॅप्सची जाहीरात करून युवकांची दिशाभूल करत आहेत आणि या दोघांना अटक करावी, अशी मागणीही केली आहे.
एका युवकानं या ऑनलाईन अॅपसाठी पैसे उसणे घेतले होते आणि ते परत करू न शकल्यानं आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
हार्दिक-नताशाला मुंबई इंडियन्सच्या हटके शुभेच्छा; कार्टुन फोटो व्हायरल
श्रीसंतच्या रुममध्ये राहायच्या मुली, लाखो रुपयांचं व्हायचं बिल; क्रिकेटपटूचा धक्कादायक गौप्यस्फोट!
Sex Workersच्या मुलीही 'पंख' पसरून घेणार भरारी; गौतम गंभीरने घेतली जबाबदारी
दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाजाचा पराक्रम; इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!
आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत इंग्लंडनं उघडलं खातं!
Web Title: Petition filed in the Madras High Court seeking Virat Kohli's arrest for promoting 'online gambling'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.