भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील अव्वल फलंदाज आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) अव्वल स्थानही पटकावले. पण, जेव्हा विराटच्या शुभेच्छांची चर्चा होते, तेव्हा तो भारतीय संघासाठी कमनशिबी असल्याचे समोर आले आहे. मग तो संघ पुरुषांचा असो की महिलांचा किंवा कनिष्ठ गटाचा...त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. त्यानंतर गेल्या महिन्याभरात भारतीय युवा संघ आणि महिला संघांना आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवता आला नाही.
आता याचा आणि विराटच्या सोशल अकाऊंटचा काय संबंध, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, अभिनय ठाकूर या नेटिझन्सने विराट आणि भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचं सोशल अकाऊंट बंद करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या दोघांनीही आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत टीम इंडियाला शुभेच्छा देऊ नये, अशी या नेटिझन्सची मागणी आहे. कारण, या दोघांच्या शुभेच्छा टीम इंडियासाठी अपशकुनी ठरत असल्याचा दावाही त्यानं केला आहे.
भारतीय महिला संघाला रविवारी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत यजमान ऑस्ट्रेलियाकडून ८५ धावांनी पराभव पत्करावा लागला. महिन्याभरापूर्वी भारताच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. कोहली आणि वीरूनं शुभेच्छा दिल्यामुळे टीम इंडियाचे जेतेपद हुकले, असा या नेटिझन्सचा दावा आहे. त्यामुळे त्यानं सोशल मीडियावर एक याचिका दाखल केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
''आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कोहली आणि वीरू यांना टीम इंडियाला शुभेच्छा देण्यापासून रोखा. विशेषतः जेव्हा संघ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत असेल तेव्हा. हे दोघेही भारताच्या विजयात अडथळा निर्माण करणारे व्यक्ती आहेत. त्यांनी टीम इंडियाला शुभेच्छा देणे थांबवले नाही, तर त्यांचं सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करा,'' अशी मागणी ठाकूर याने केली आहे. ''विराट कोहली हा टीम इंडियात नकारात्मकता निर्माण करणारा व्यक्ती आहे,''असे एका नेटिझन्सने म्हटले आहे. ठाकूरच्या याचिकेला १००० हून अधिक लोकांनी पाठींबा दर्शविला आहे.
भारतीय संघाला २०१५ आणि २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही. २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला अंतिम चौघातही स्थान पटकावता आले नाही. महिला क्रिकेट संघाला २०१७च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम फेरीत इंग्लंडकडून ९ धावांनी हार मानावी लागली. त्याचवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पुरुषांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona वगैरे विसरा... क्रिकेट अन् आयपीएलचा आनंद लुटा... BCCI ची तिजोरी भरा!
सचिन तेंडुलकर पहिल्याच षटकात माघारी, पण इरफानची फटकेबाजी लै भारी!
IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
भारत-पाकिस्तान भांडणामुळे ICCसमोर पेच; वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, पण...
Web Title: Petition to ‘stop Virat Kohli from congratulating Team India in ICC tournaments’ attracts almost 1000 people svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.