भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान हे उल्लेखनीय आहे. त्यामुळेच त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. युवकांच्या तो आदर्शस्थानी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. आता महेंद्रसिंग धोनीचा प्रेरणादायी प्रवास शाळेत शिकवला जाणार आहे आणि त्याच्या आयुष्यावरील धडा शाळेच्या पुस्तकामध्ये आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
साजन प्रकाशच्या यशामागे 'एकट्या' आईचा संघर्ष; एक वर्षाचा असताना वडील गेले सोडून अन्...
महेंद्रसिंग धोनीनं मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता धोनी फक्त इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत चॅप्टर ७ वर धोनीच्या आयुष्यावरील धडा आहे. या फोटोत धोनीला टीम इंडियाचा कर्णधार म्हटले गेले आहे, त्यामुळे हा फोटो जुना असावा असा अंदाज लागतोय.
MS Dhoni आयपीएल २०२२त खेळणार की नाही?; चेन्नई सुपर किंग्सची महत्त्वाची घोषणा
आयपीएलच्या पुढील पर्वात दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार असल्यामुळे मेगा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं नियमावली तयार केली असून प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंनाच संघात कायम राखता येणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) सह अन्य संघ कोणत्या चार प्रमुख खेळाडूंना कायम राखते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यात आता पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
माहीचा सध्याचा फॉर्म पाहता तो आयपीएल २०२२ खेळण्याची शक्यता फार कमी आहे, असा अंदाज बांधला जात आहे. पण, याबाबत कोणीच ठाम सांगू शकत नाही. धोनी CSKच्या प्रशिक्षक किंवा मेंटॉरच्या भूमिकेतही दिसू शकतो, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. CSKचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी महेंद्रसिंग धोनी हा आणखी १ किंवा दोन वर्ष संघासोबत कायम राहणार आहे. तो पूर्णपणे तंदुरूस्त आहे, कसून सराव करतोय आणि त्यानं थाबण्याच काहीच कारण दिसत नाही, असे सांगितले.