भारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’? स्टिंग आॅपरेशनमध्ये दावा

गेल्या वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात फिक्सरांच्या निर्देशांवर कदाचित खेळपट्टीसोबत छेडछाड करण्यात आली होती, असा दावा एका स्टिंग आॅपरेशनमध्ये करण्यात आला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:46 AM2018-05-27T00:46:29+5:302018-05-27T00:46:29+5:30

whatsapp join usJoin us
 'Pitch fixing' in India-Sri Lanka Test? Claim in sting operation | भारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’? स्टिंग आॅपरेशनमध्ये दावा

भारत-श्रीलंका कसोटीत ‘पिच फिक्सिंग’? स्टिंग आॅपरेशनमध्ये दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - गेल्या वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात फिक्सरांच्या निर्देशांवर कदाचित खेळपट्टीसोबत छेडछाड करण्यात आली होती, असा दावा एका स्टिंग आॅपरेशनमध्ये करण्यात आला आहे. आयसीसीने आज या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ केला आहे.
अल जजीरा टीव्ही नेटवर्कने दावा केला आहे, की मुंबईचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसने गेल्या वर्षी खेळपट्टीसोबत छेडछाड करण्यासाठी गालेतील मैदानावरील एका कर्मचाऱ्याला लाच दिल्याचे मान्य केले आहे. या स्टिंग आॅपरेशनचे प्रसारण सोमवारी होणार आहे, पण याच्या काही चित्रफिती (झलक) कतारमधील या वाहिनीने आॅनलॉईन पोस्ट केल्या आहेत. आयसीसीचे महाव्यवस्थापक (भ्रष्टाचार विरोधी समिती) अ‍ॅलेक्स मार्शल यांनी स्पष्ट केले, ‘आम्ही आतापर्यंत मिळालेल्या मर्यादित माहितीच्या आधारावर आपल्या सदस्य देशांच्या भ्रष्टाचारविरोधी सहकाºयांसह या प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ केला आहे. संपूर्ण चौकशी करण्यासाठी क्रिकेट भ्रष्टाचारासोबत जुळलेले सर्व पुरावे व लेखाजोखा आम्हाला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती आम्ही केली आहे.’

हा सामना २६ ते २९ जुलै या कालावधीत भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान खेळल्या गेला होता. वाहिनीने आपल्या वेबसाईटवर दावा केला, ‘गाले स्टेडियममध्ये सहायक व्यवस्थापक, मैदानावरील कर्मचारी थरंगा इंडिकाने गोलंदाज व फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी तयार करू शकतो, असे म्हटले होते. जर तुम्हाला फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी आवश्यक असेल तर ते होईल.’
क्लिपिंगमध्ये मॉरिसने इंडिकाकडे इशारा करताना म्हटले, ‘तो व आम्ही आम्हाला जशी वाटते तशी खेळपट्टी तयार करू शकतो.
तो मैदानावरील मुख्य कर्मचारी व सहायक व्यवस्थापकही
आहे.’
भारताने हा सामना ३०४ धावांनी जिंकला होता. पहिल्या डावात भारताने ६०० धावा केल्या होत्या. त्यात शिखर धवनने १९० आणि चेतेश्वर पुजाराने १५३ धावांचे योगदान दिले होते. भारताने दुसरा डाव ३ बाद २४० धावसंख्येवर घोषित केला होता. त्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी केली होती. श्रीलंकेचे दोन्ही डाव अनुक्रमे २९१ व २४५ धावांत संपुष्टात आले होते. हा सामना चार दिवसांमध्ये संपला होता.
इंडिकाने कथित दावा केला की, त्याने फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी तयार केली होती. स्टिंग व्हिडिओमध्ये त्याने म्हटले की,‘भारतीय संघ फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर खेळला. आम्ही खेळपट्टीला रोलरच्या माध्यमातून प्रेस केले आणि त्यावर पाणी टाकत टणक बनविले.’
वादांसोबत नाते असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग खेळण्याचा अनुभव असलेल्या मॉरिसने अंडरकव्हर रिपोर्टरला कथित प्रकरणी म्हटले की, तो सट्टा लावण्यासाठी त्याला टीप्स देईल. यंदा नोव्हेंबरमध्ये इंग्लंडच्या श्रीलंका दौºयातही या मैदानावर ‘पिच फिक्सिंग’ करण्यात येईल, असा दावाही त्याने यावेळी केली.
श्रीलंका क्रिकेटसाठी खेळपट्टीची छेडछाड वाद नवा नाही. २०१६ च्या सुरुवातीला आयसीसीने गालेचे क्युरेटर जयनंद वार्नवीरा यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले होते. कारण त्यांनी भ्रष्टाचारविरोधी समितीसोबत (एसीयू) सहकार्य करण्यास नकार दिला होता.
वार्नवीरा त्यावेळी सुरू असलेल्या चौकशीच्यावेळी दोनदा एसीयूसोबत पूर्वनिर्धारित मुलाखतीसाठी उपस्थित झाले नव्हते आणि चौकशीसाठी मागण्यात आलेले पुरावे देण्यात अपयशी ठरले होते.
गेल्या वर्षी एका भारतीय वाहिनीने महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज व पुणे येथील क्युरेटर पांडुरंग सालगांवकर यांचे स्टिंग आॅपरेशन केल्याचा दावा केला होता की त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे लढतीत ‘पिच फिक्सिंग’ करण्यास मंजुरी दिली होती.
त्यानंतर आयसीसी एसीयूच्या चौकशीमध्ये सालगांवकर यांना क्लीन चिट मिळाली, पण सट्टेबाजांसोबतच्या संपर्काची माहिती आयसीसीला न दिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.(वृत्तसंस्था)

Web Title:  'Pitch fixing' in India-Sri Lanka Test? Claim in sting operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.