चेम्सफोर्ड : टीम इंडिया खेळपट्टी आणि हवामान याबाबत ओरड करीत रडत बसणार नाही. आम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नसून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी निर्धारानेच खेळणार आहोत. कठीण परिस्थिती हे आमच्यासाठी कारण नाहीच, असे कोच रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले.भारतीय संघ एसेक्स कौंटी मैदानातील खेळपट्टी आणि आऊटफिल्ड यावरून नाराज असून, एकमेव सराव सामना चारऐवजी तीन दिवसांचा ठेवण्यात आला आणि यामागे गरमीचे कारण देण्यात आल्याने भारताने नाराजी व्यक्त केल्याचे एका वृत्तात म्हटले होते. तथापि, शास्त्री यांनी आम्ही बहाणेबाजीवर विश्वास ठेवत नसल्याचे ‘खास’ शैलीत स्पष्ट केले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘माझे धोरण वेगळे आहे. तुमच्या देशात मी तुम्हाला प्रश्न करणार नाही आणि माझ्या देशात तुम्ही मला प्रश्न विचारू नका. मी मैदान कर्मचाऱ्यांना गवत न काढता आहे तशी खेळपट्टी राहू द्या, असे सांगितले. या दौºयात भारतीय संघ कुठलाही बहाणा करणार नाही. जगात परदेश दौºयात सर्वांत चांगला व्यवहार करणारा संघ म्हणून माझ्या संघावर मला गर्व आहे. सध्याचा भारतीय संघ कुठलीही तक्रार न करणारा संघ असेल, असा विश्वास देतो.’खेळपट्टीबाबत ते म्हणाले, ‘या खेळपट्टीवर चांगले गवत आहे. गवत काढण्याविषयी मैदान कर्मचाºयांनी मला विचारणा केली होती. मीत्यांना सांगितले, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही आमच्या देशात याल तेव्हा खेळपट्टीबाबत कुठलाही सवाल उपस्थित करू नका.’सामना चारऐवजी तीन दिवसांचा करण्यात आल्यामागे गरमीचे कारण देण्यात आले आहे. याविषयी विचारताच शास्त्री म्हणाले, ‘हवामान आणि अन्य सोई पाहून सामना कमी दिवसांचा करण्यात आला आहे. आम्हाला यामुळे पहिल्या कसोटीआधी बर्मिंघम येथे तीन दिवस सराव करण्याची संधी मिळणार आहे. चार दिवसांचा सामना खेळल्यास एक दिवस आणखी प्रवासात जाईल. वेळ कमी करण्याचा निर्णय मंगळवारी सरावानंतर घेण्यात आला. आम्ही तर दोन दिवसांचा सामनादेखील खेळायला तयार होतो, पण एसेक्सच्या अधिकाºयांसोबत बोलणे झाल्यानंतर तीन दिवसांचा सामना निश्चित करण्यात आला. यामागे एजबेस्टन मैदानावर रविवारी सराव करण्याची इच्छा होती. आम्ही शनिवारी बर्मिंघमला पोहोचणार असून रविवारी सराव करणार आहोत. कसोटी सामन्याआधी ताळमेळ साधायचा हे यामागील कारण असल्याचे त्यांनी सांगितले.तुमच्या देशात खेळपट्टी कशी बनवायची हे मी विचारणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही आमच्या देशात आल्यानंतर कोणताही प्रश्न विचारायचा नाही. आम्ही या दौऱ्यात खेळपट्टीसंदर्भात कोणतेही कारण सांगणार नाही. खेळपट्या कशा बनवायच्या हा यजमान देशाचा अधिकार आहे. मी ज्या भारतीय संघाला प्रशिक्षण देतोय तो संघ हवामान-खेळपट्टीबद्दल कधीही सबब देणार नाही. इंग्लंडचा पराभव करणे हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वोत्तम संघावर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.- रवी शास्त्री,प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट संघ
- Cricket Buzz»
- बातम्या»
- खेळपट्टी, हवामानाची सबब सांगणार नाही- रवी शास्त्री
खेळपट्टी, हवामानाची सबब सांगणार नाही- रवी शास्त्री
कठीण परिस्थितीतही इंग्लंडमध्ये मालिका विजयाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:29 AM